Uncategorized

बौद्ध पौर्णिमेला झालेल्या अंबाबारवा अभयारण्यास झालेली प्राणी गणना,प्राणीगणनेसाठी ५ वनपाल,१९ वनरक्षक, ४९ मजुरांची नियुक्ती!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी
प्रकाश दांडगे (जळगाव जामोद)

जळगाव जामोद: जळगाव जामोद तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी व कुशीत अभयारण्य असून निसर्गप्रेमी व पर्यटनासाठी एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. जळगाव जामोद तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले वसाडी येथे इको पार्क व अंबाबरवा पर्यटन क्षेत्रात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा निसर्ग अनुभव कार्यक्रमाचे व प्राणीगणनेचे आयोजन करण्यात आले होते. सोनाळा वनपरिक्षेत्र अंतर्गत पौर्णिमेच्या चंद्राच्या लखलखत्या प्रकाशात बुद्ध पौर्णिमेच्या रात्री 23 मे रोजी वन्य प्राण्यांची गणना झाली. त्यामुळे 23 मे च्या दुपारपासून ते 24 मे च्या संध्याकाळपर्यंत जंगल सफारी बंद होती. अंबाबरवा अभयारण्यात 24 मे च्या रात्री बुद्ध पौर्णिमेला चंद्राच्या प्रकाशात वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली होती. वन्य प्राणी व पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले होते. अंबाबरवा अभयारण्यात एकूण ५ वर्तुळ व १९ वर्तुळ आहे. निसर्ग अनुभव कार्यक्रमासाठी अभयारण्यात नैसर्गिक ७ तर कृत्रिम 24 असे एकूण 31 पाठवणे तयार करण्यात आले होते. मागील वर्षी निसर्गप्रेमींना प्रवेश नाकारण्यात आला होता. परंतु यावर्षी १० पाठवण्यावर प्रवेश देण्यात आला असल्याने वन्य प्राणी निसर्गप्रेमी मध्ये उत्साह संचारला तर इतर ठिकाणी वन्यजीवन गावातील अधिकारी कर्मचारी वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली होती. पौर्णिमेनिमित्त वन्य प्राण्यांच्या घटनेसाठी पूर्वतयारी म्हणून 31 मचान अभयारण्यात आले असून त्यावर बसून पर्यटकांची उपस्थिती प्राणी गणना करण्यात आली होती. प्रत्यक्ष नजरेत येणाऱ्या वन्यजीवांची गणना महत्त्वाची ठरली होती. गेल्या आठवड्यात घरापासून ढगाळ वातावरण, वादळ, व अवकाळी पाऊस अधून मधून सुरूच होता. 22 मे रोजी सकाळी सुद्धा ४ वाजेच्या दरम्यान विजेचा कडकडाट व वादळासह अवकाळी पाऊस वारस ला होता.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button