Uncategorized

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! शेतकऱ्यांनी विशिष्ट बियाणे, खताचा आग्रह धरू नये! कृषी विभागाचे आवाहन; कपाशी लागवड “या” तारखे नंतरच करा! बियाणे खरेदी करताना काय काळजी घ्यायची?

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी
प्रकाश दांडगे (जळगाव जामोद)

शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागलेला असून शेतीची मशागत करण्यात येत आहे. येत्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी विशिष्ट बियाणे वाण आणि रासायनिक स्वतःचा आग्रह धरू नये! असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
जिल्ह्यात कपाशी आणि सोयाबीन मुख्य पिके आहेत. या पिकाची उत्पादन हे जमिनीची पोत, पाऊसमान, योग्य वेळी केलेली मशागत यावर अवलंबून आहे.
पिकाच्या योग्य वेळेत झालेला पाऊस, जमिनीचा उत्तम होत आणि लेडीज केलेल्या मशागतीमुळे भरघोस उत्पन्न मिळते.
सोयाबीन पिकात स्वपनरागीकरण होत असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाण्याची दरवर्षी बाजारातून नवीन वाण खरेदी करण्याची आवश्यकता नाही. एकदा खरेदी केलेल्या बियाण्याचे योग्य प्रकारे संवर्धन केल्यास सदर बियाणे तीन वर्षात वापरल्यास बियाण्यांवरील खर्च कमी होतो. तरीही काही भागातील शेतकरी विशिष्ट कापूस आणि सोयाबीन बियाणे वाणाची मागणी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाण्यांमध्ये सर्व वाण हे उत्कृष्ट दर्जाच्या असून भरपूर उत्पन्न देणारे आहेत. कपाशीतील सर्व वाणाची बीटी जैव तंत्रज्ञान एकच असून सर्वांची उत्पादन क्षमता जवळपास सारखीच आहे . त्यामुळे शेतकऱ्यांनी एकाच वाहनाचा आग्रह धरू नये.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button