क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले न.प. मराठी प्राथमिक शाळा क्रमांक १ च्या शालेय व्यवस्थापन समितीची निवड

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा : क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले न.प. मराठी प्राथमिक शाळा क्रमांक १, देऊळगाव राजा येथे शिक्षणाचा अधिकार अधिनियम (RTE Act, 2009) मधील तरतुदींनुसार शालेय व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड करण्यात आली.
या समितीच्या अध्यक्षपदी किरण डोईफोडे तर उपाध्यक्षपदी मनीषाताई सरपते यांची बिनविरोध निवड करण्यात आली.शिक्षण तज्ज्ञ म्हणून सुरज गुप्ता यांची निवड झाली. तसेच
समितीच्या सदस्यपदी पत्रकार विलास जगताप, अॅड. भालचंद्र डोईफोडे, अॅड. परमेश्वर शेलके, लताताई बोरकर, साधनाताई पवार, वैशालीताई गवळी, अनुराधाताई पवार, अश्विनीताई गव्हाणे व जावेद खान यांची निवड करण्यात आली. दि.20 ऑगस्ट रोजी पालक सभेचे आयोजन शाळेमध्ये करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ सदस्य बळीराम मापारी हे होते. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापीका राजमाने मॅडम यांनी सांगितले की
RTE कायद्यानुसार शाळा व्यवस्थापन समिती ही शाळेच्या विकासामध्ये पालकांचा व समुदायाचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणारी महत्त्वाची व्यवस्था आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व समान शैक्षणिक संधी मिळणे, शाळेतील शैक्षणिक वातावरण अधिक सक्षम करणे, उपलब्ध सुविधांचा योग्य वापर, शाळा विकास आराखडा तयार करणे तसेच विद्यार्थ्यांच्या हक्कांचे संरक्षण यासाठी समितीची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.
नवनिर्वाचित शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम, शाळेच्या भौतिक सुविधांचा विकास तसेच पालक-शिक्षक-समाज यांच्यातील समन्वय अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.या सभेचे प्रास्ताविक मंगल गाडगे सर व आभार अनिल बुरकुल सर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सतीश पिंगळेसर,प्रदीप गाडे सर,अनंता सानप सर,सुधाकर इंगळेसर, शिक्षिका संगीता कुमठे, प्रतिभा लोंढे ,जिजा जीठे ,उर्मिला वाघ, संगीता देवकर, रिता वाघ यांनी परिश्रम घेतले.
नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, शिक्षण तज्ज्ञ व सर्व सदस्यांचे मुख्याध्यापक तथा शिक्षक व कर्मचारी वृंद, समस्त पालकवर्ग आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले न.प. मराठी प्राथमिक शाळा क्रमांक १, देऊळगाव राजा यांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.



