बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

भविष्यात चांगला माणूस म्हणून प्रत्येकाचे व्यक्तिमत्व घडावे.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी-संजय खेडेकर

चिखली- विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात एखाद्या छंदाबरोबर वाचन संस्कृतीची जपवणूक करून भविष्यात चांगला माणूस म्हणून प्रत्येकाचे व्यक्तिमत्व घडावे. असे प्रतिपादन ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन निळे यांनी केले.
तालुक्यातील करतवाडी येथे जिल्हा परिषद मराठी शाळेत स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तुळस या कथासंग्रहाचे प्रकाशन आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी निळे बोलत होते.
यावेळी गावच्या सरपंच सौ. शारदाताई मळसणे , मुख्याध्यापक राजू अंभोरे, उपसरपंच सौ. संगीता जाधव, ग्रामरोजगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन निळे, तुळस कथासंग्रहाचे लेखक गजेंद्र सदावर्ते, प्राध्यापक गजानन सपकाळ सर, शाळा व्यवस्थापन समितीची अध्यक्ष सूर्यनारायण मळसणे , सो वंदना सपकाळ, सौ आशा तायडे, अंकुश मळसणे, अनंता मळसणे , भागवत मळसणे , अंगणवाडी सेविका दांडगे ताई, ग्राम सखी सौ उर्मिला निळे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
तुळस कथासंग्रह ग्रामीण जीवनावर आधारित असून त्यामध्ये बारा कथांचा समावेश असल्याचे लेखक गजेंद्र सदावर्ते यांनी सांगितले. यावेळी पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक रामदास भगत सर यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक राजू अंभोरे सर यांनी केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button