पालखी सोहळ्यात स्वच्छतेचा संदेश

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी :गजानन तांगडे, खामगांव
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुक्तांगण फाउंडेशनच्या वतीने श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
श्री संत गजानन महाराजांच्या पावन पालखी सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी, भाविक भक्त आणि नागरिक सहभागी होत असतात. या पवित्र सोहळ्यादरम्यान परिसरात निर्माण होणारा कचरा तातडीने साफ करून परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी मुक्तांगण फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.
“स्वच्छता हीच सेवा, स्वच्छ परिसर हीच खरी भक्ती” या भावनेतून पालखी मार्ग, परिसर तसेच भाविकांच्या वर्दळीच्या ठिकाणी कचरा साफसफाई करण्यात आली.
समाजामध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी आणि धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांमध्ये स्वच्छतेची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
श्री संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याची पवित्रता, परंपरा आणि सामाजिक बांधिलकी जपत मुक्तांगण फाउंडेशनकडून राबविण्यात आलेला हा स्वच्छता उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.
स्वच्छ गाव • सुंदर गाव • निरोगी गाव
स्वच्छता राखूया, संतांच्या पालखी सोहळ्याची शोभा वाढवूया!



