मध्य रेल्वेचे विभागीय कार्यालय जालना येथे सुरू होण्यासाठी रेल्वे संघर्ष समिती प्रयत्नशील

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा:दिनांक 20 ऑगस्ट 2026) जालना रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने यापूर्वी जनतेच्या सोयीसाठी विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलने केली याचाच एक भाग म्हणून बहुप्रतिक्षित असलेला व इंग्रज कालीन सर्वेक्षण झालेला जालना ते खामगाव रेल्वे मार्गासाठी अथक प्रयत्नांती रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली असून आता संघर्ष समितीने पुढचा लढा हा मध्य रेल्वेचे विभागीय कार्यालय जालना येथे सुरू करण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे त्यासाठी जालना रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष सुभाष देविदान यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन देशाचे आयुष मंत्रालयाचे मंत्री प्रतापराव जाधव , चिखली च्या आमदार श्वेता महाले यांची भेट घेऊन पुढील नियोजन करण्यासाठी सविस्तर चर्चा दिनांक 18 ऑगस्ट 26 रोजी केली व नंतर देऊळगाव राजा येथील रेल्वे संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची विश्रामगृहावर भेट घेऊन सप्टेंबरमध्ये रेल्वे लोक परीशदेचे आयोजन जालना येथे करण्यात येणार असल्याचे सांगून पुढील लढ्यासाठी सर्वांनी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
याबाबत सविस्तर असे की भारतीय रेल मंत्रालयाचे वतीने संपूर्ण देशभर रेल्वेचे जाळे अधिक वाढवण्याचे नियोजन करण्यात येत आहे वाढती लोकसंख्या व अपुऱ्या रेल्वेमुळे प्रवाशांना अनेकदा खूप त्रास सहन करावा लागत आहे जालना हे महाराष्ट्रातील प्रमुख शहर असून औद्योगिक दृष्ट्या फार प्रगतीपथावर आहे या ठिकाणी सीड हब स्टील हब रेशीम हब सह मोठमोठे प्रकल्प कार्यान्वित आहे दळणवळणाची सुविधा उपलब्ध झाल्यास याहीपेक्षा अधिक उद्योग या ठिकाणी उभारले जाऊ शकतात हीच बाब हेरून जालना रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने आता जालना शहरात मध्य रेल्वेचे विभागीय कार्यालय सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे या प्रकल्पासाठी स्वतः रेल्वेची दोनशे एकर जागा उपलब्ध असल्याचे संबंधितांच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहे यासाठी सर्वपक्षीय लढा आवश्यक असल्याचे या समितीचे अध्यक्ष सुभाष देविदान व महासचिव फिरोज आली यांनी सांगितले सप्टेंबर महिन्यात जालना येथे रेल्वे लोक परिषदेचे आयोजन करण्यात येणार असून यामध्ये पुढील कामाची दिशा ठरवण्यात येणार आहे यावेळी जालना रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष सुभाष देविदान, महासचिव फिरोज अली, उपाध्यक्ष अशोक मिश्रा पत्रकार, गोपाल भुरेवाल, संतोष खंडेलवाल, देऊळगाव राजा रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष गोविंद झोरे, कार्याध्यक्ष सन्मती जैन, मुशीर कोटकर, मनीष काबरा, डॉक्टर अशोक काबरा, विलास जगताप, श्याम गुजर, अनिल बाहेती,गोपाल व्यास, ॲड.पुरुषोत्तम धन्नावत,जुगलकिशोर हरकुट, रवींद्र इंगळे, विजय जाधव, वसंत अप्पा खुळे उपस्थित होते.



