रिधोरा ग्रामपंचायत साडेपाच लाख अपहार !तत्कालीन सरपंच व सचिवावर एफ आय आर !!

सरपंच व ग्रामपंचायत सचीवा विरोधात साडेपाच लाख अपहार प्रकरणी फौजदारी एफ आय आर तक्रार दाखल.
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव : – रिधोरा येथील तत्कालीन सरपंच राधेश्याम कुंडलिक घुगे, व तत्कालीन सचिव राजेश प्रकाश गोटे यांच्याविरूध्द एकुण 5.34,906/-रु. अनधिकृतरित्या खर्च केल्याचे चौकशीत निष्पन्न होवून फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी मालेगाव पोलीस स्टेशनला पंचायत समिती विस्तार अधिकारी यांच्या कडून रितसर तक्रार दाखल झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
विस्तार अधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीत गट विकास अधिकारी, पंचायत समिती, मालेगांव यांचे आदेश क्र. 3707/2024, दि. 23/10/2024 नुसार ग्रामपंचायत रिधोरा येथील शासकीय कामकाजामध्ये झालेल्या गैख्यवहाराकरीता फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी मला प्राधीकृत केलेले आहे. त्यानुसार मी पोलीस स्टेशन मालेगांव येथे ग्राम रिधोरा येथील तत्कालीन सरपंच राधेश्याम कुंडलिक घुगे, व तत्कालीन सचिव राजेश प्रकाश गोटे यांच्या विरूध्द फौजदारी तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला येवून त्यानुसार सदर गैरव्यवहारा मध्ये वि. के. खिल्लारी विस्तार अधिकारी, पंचायत समिती, रिसोड, ग्राम पंचायत रिधोरा येथील तक्रारीचा चौकशी अहवाल क्र. 2917/2023, दि. 24/11/2023 प्रमाणे सादर केलेला असुन त्यामध्ये आरोपी तत्कालीन सरपंच नाम राधेश्याम कुंडलीक घुगे, ग्रामपंचायत रिधोरा व तत्कालीन सचिव राजेश प्रकाश गोटे यांनी खालीलप्रमाणे गैरव्यवहार केल्याबाबत सिध्द होत आहे.
चौकशी अहवालामध्ये नमुद केल्यानुसार ग्राम पंचायत रिधोरा येथील सामान्य निधीमधुन करण्यात आलेल्या संगणक खरेदीबाबत कोणतीही नस्ती अथवा दस्तऐवज ग्रामपंचायतीकडे उपलब्ध नसणे, संगणक ग्रामपंचायतीमध्ये उपलबध नसणे, निवीदा प्रकीयेचा अवलंब न करणे, ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रकात तरतुद नसणे. दि. 08/06/2023 रोजी पंचनामा तयार करण्यात आला असता संगणक संच जोडलेला दिसुन आला नाही. केवळ 1वन कपंनीचे मॉनिटर दिसुन आले. उर्वरित सीपीयु, प्रींटर, किबोर्ड व संगंणक संबंधातील ईतर साहित्य दिसुन आले नाही. एकंदरीत संगणक नसल्याने व खरेदी प्रक्रिया केलेली नसल्याने खर्च करण्यात आलेली रक्कम रूपये 79,900/- चा खर्च अनधिकृतरित्या केलेला दिसुन येतो.
दि. 06/12/2022 रोर्जा 90,000/-रू. ग्रामपंचायत आचारसंहितेच्या काळात स्वतःचे नावे काढल्याबाबत ग्रामपंचायत बैंक स्क्रोलची पाहणी केली असता दि. 06/12/2022 रोजी धनादेष क्र. 000123 द्वारा रू. 90,000/- स्वतःचे नावे काढलेले दिसतात. याबाबत तत्कालीन सचिव आर. पी. गोटे यांनी बयान दिले की, सामान्य फंडातुन धनादेप क्र. 000123 रक्कम रू. 90,000/- गहाळ होउन ग्रामपंचायत खात्यातुन 90,000/- रु. कमी झाले. याबाबतीत त्यांनी कोणतीही फौजदारी तक्रार केलेली नाही. सदर धनादेपाच्या पाठीमागे सरपंच व सचिव यांच्या सहया आहेत. त्यामुळे पैसे सरपंच व सचिव यांनीच काढल्याचे सिध्द होते. तसेच सामान्य निधीमधुन खर्च करतांना लेखा संहितेचे पालन केले नाही असे दिसुन येते.
15 वा वित आयोग अंतर्गत ग्रामपंचायतीने शाळा व अंगणवाडीला नळ जोडणी काम केले आहे. तांत्रीक मान्यता क्र. 64, दि. 12/11/2021 नुसार या कामासाठी रू. 1,06,235/-रू. ची अंदाजपत्रकीय तरतुद आहे. सदर कामावर रू.1,04,021/-रू. एव्हढा खर्च करण्यात आलेला आहे, कामाचे मुल्यांकण रू. 64015/-दर्शविले आहे. अर्थात रू. 40,006/-एव्हढा खर्च मुल्यांकनापेक्षा जास्त असल्याने अनधिकृत आणि वसुलक्षम ठरते. प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना यात लाईट खरेदी यावर करण्यात आलेला खर्च कम्ड या अधिकृत पोर्टलवरून C.R.B (एन.सी.आर.बी)1.1.F.-1 (एकीकृत अन्वेषण फॉर्म – १) खरेदी केलेली दिसुन येत नाही बिल नाही, खरेदीची विहीत प्रक्रिया केलली नाही, खरेदीची कायदेशीर प्रक्रिया केलेली नाही. त्यामुळे रु. 3,25,000/-रू. चा खर्च हा अनधिकृतरित्या केला असल्याचे अहवालावरून दिसुन आल आहे.
ग्रामपंचायत रिधोरा, ता. मालेगाव येथील सरपंच राधेश्याम कुंडलीक घुगे यांचा सरपंच पदाचा कालावधी दि. 04 जानेवारी 2017 त दि. 03 जानवारी 2023 हा आहे. तसेचे सदर कालावधीत ग्राम सचिव म्हणुन व्ही. बी बोटे यांनी दि. 09/12/2021 राजी सदर पदाचा पदभार घेतलेला होता, त्यामुळे तत्कालीन ग्रामपंचायत सरपंच आणि सचीव यांनी त्यांचे कर्तव्यकाळामध्ये ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारामध्ये अपहार केला आहे. त्यामुळे विजय खिल्लारे, विस्तार अधिकारी, पंचायत समिती, रिसोड यांनी जा.क्र./पसरि/पंचा/2957/2023, दि. 24/11/2023 प्रमाणेच्या चौकशी अहवालाचे अवलोकन केले असता, वरील ग्रामपंचायत सरपंच व संयुक्त खात्यातुन सामान्य निधी मधुन 79,900/-रू. अनधिकृतरित्या खर्च केले आहेत. तसेच 90,000/-रु. चा सचिव यांनी निष्वित गैस्व्यवहार केला आहे, त्याचप्रमाणे 15 वा वित्त आर्याग अंतर्गत करण्यात आलेल्या कामांतर्गत 40,006/- अ. अनधिकृत व वसुलक्षम खर्च कलेला आहे, तसेच प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना 3,25,000/-रू. असा एकुण 5.34,906/-रु. अनधिकृतरित्या खर्च केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार सदर आरोपीविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्याकरीता रितसर तक्रार मालेगाव पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोपीविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याने तालुक्यातच नाही तर वाशीम जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.



