धनज ते मुर्तीजापुर बस तातडीने सुरू करा:- सामाजिक कार्यकर्ते आशिष धोंगडे यांची मागणी

अकोला विभाग नियंत्रक श्रीमती शुभांगी शिरसाट यांना दिले निवेदन
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
वाशिम:- धनज ते मुर्तीजापुर बस सुरळीत वेळेनुसार सुरू करण्यासंदर्भामध्ये दि.२८/०७/२०२३ रोजी अकोला विभाग नियंत्रण श्रीमती शुभांगी शिरसाठ यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनामध्ये धनज ते मुर्तीजापुर बस तातडीने सुरू करण्यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते आशिष धोंगडे यांनी मागणी केली आहे.कोरोनाच्या काळात ही बस सेवा बंद केली आहे.याआधीही बस सेवा सुरळीत आणि आगाराला उत्पन्न देणारी बस सेवा होती.कामरगाव हे 36 खेडे ला लागून असलेले एक मोठी बाजारपेठ आहे.यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खेड्यापाड्यातून येणारे विद्यार्थी कामरगाव मध्ये शिक्षण घेत आहे.अशा परिस्थितीमध्ये ही बस सेवा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.तसेच वृद्धांना पण बस सुरळीत नसल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे.ही बस सेवा सुरळीत करण्यासंदर्भामध्ये धनज ते मुर्तीजापुर रस्त्यावरील ग्रामपंचायत यांनी ठराव देऊन सुद्धा आगर व्यवस्थापक मुर्तीजापुर यांना ही बस सेवा सुरळीत केली नाही आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात निराशा पाहायला मिळत आहे.हे बस सेवा तातडीने सुरू करावी यासाठी अकोला विभाग नियंत्रक यांना निवेदन देऊन ही बस सेवा सुरळीत करावी त्यासाठी निवेदनातून मागणी केली आहे.



