बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शेतात औषध फवारणी करताना सर्पदंश; शेतकऱ्याचा मृत्यू

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगावराजा ; जवळखेड शिवारातील पहाडी परिसरातील शेतात औषध फवारणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि. १४) सकाळी घडली. मधुकर कडुबा कायंदे (वय ४५, रा. उंबरखेड, ता. देऊळगावराजा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे उंबरखेड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मधुकर कायंदे हे सोमवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास जवळखेड शिवारातील पहाडी परिसरातील आपल्या शेतात औषध फवारणी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना शेतात सर्पदंश झाल्याची माहिती शेतालगत असलेल्या शदर शेषराव कायंदे यांनी त्यांच्या भावाला रामेश्वर कायंदे यांना फोनद्वारे दिली.
माहिती मिळताच रामेश्वर कायंदे यांनी मोटारसायकलने शेताकडे धाव घेतली. तेथे मधुकर कायंदे हे बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळून आले.

रामेश्वर कायंदे व शदर कायंदे यांनी त्यांना तातडीने मोटारसायकलवरून देऊळगावराजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर मधुकर कायंदे यांना मृत घोषित केले.
या घटनेप्रकरणी मृतकाचे भाऊ रामेश्वर कडुबा कायंदे यांनी देऊळगावराजा पोलिस ठाण्यात माहिती दिली आहे. त्यांच्या तोंडी रिपोर्टनुसार पोलिसांनी नोंद घेतली असून, पोलिस निरीक्षक ब्रह्म संताराम गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button