अपघाती निधन झालेल्या शिवाजी सुरडकर यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
आवाज न्यायाचा
चिखली तालुका: प्रतिनिधी अरुणा दत्तात्रय खंडागळे
वाडी ब्रम्हपुरी येथे श्री. अंकुशराव पाटील यांचा सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय;मुलीच्या शिक्षणासाठी मदतीचा हात
वाडी ब्रम्हपुरी येथील राहिवासी शिवाजी सुरडकर यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. त्यांच्या पश्चात कुटुंबावर आलेल्या दुःखद प्रसंगी त्यांच्या विधवा पत्नी जिजाबाई सुरडकर यांची भेट घेऊन श्री. अंकुशराव पाटील यांनी त्यांचे सांत्वन केले.
यावेळी सुरडकर कुटुंबाच्या अडचणींची जाणीव ठेवत त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी श्री. अंकुशराव पाटील यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली. संकटाच्या काळात कुटुंबाच्या पाठीशी उभे राहून मुलीचे शिक्षण खंडित होऊ नये, या सामाजिक भावनेतून ही मदत करण्यात आली.
या प्रसंगी सुनील वानखेडे सर, वीरेंद्र वानखेडे, रामदास पाटील, सुभाष वानखेडे, निळकंठ वानखेडे, दिलीपराव वानखेडे, भगवानराव काळे, छगनराव वानखेडे तसेच वाडी ब्रम्हपुरी येथील समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
दुःखाच्या प्रसंगी केवळ सांत्वन न करता गरजू कुटुंबाच्या भविष्यासाठी आधार देणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे या मदतीतून अधोरेखित झाले.



