बुलढाणा

पिंपरखेड ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी प्रशांत जुमडे यांची निवड

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
चिखली,,,,,,,, प्रतिनिधी
आरुना दत्तात्रय खंडागळे

चिखली: युवक काँग्रेस पिंपरखेड शाखेचे अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांचे कट्टर समर्थक प्रशांत रामभाऊ जुमडे यांची पिंपरखेड ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी निवड झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रशांत जुमडे हे हिरकणी महिला अर्बनमध्ये अधिकारी, युवक काँग्रेस पिंपरखेड शाखेचे अध्यक्ष म्हणून सक्रियपणे कार्यरत असून त्यांनी विविध सामाजिक व राजकीय उपक्रमांतून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेत असतात.
तसेच ते जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

त्यांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचा  सत्कार केला.
याप्रसंगी सरपंच पूनम शिवदास कांबळे, ग्रामपंचायत सदस्य पुरुषोत्तम जाधव ,सौ.रंजना सुनिल जुमडे ,सौ.वृशाली विजय इंगळे ,सौ.मनिषा संतोष उमाळे,ग्रामसेवक जोशी मॅडम, जय बजरंग व्यायाम शाळा संपर्क प्रमुख गजानन खंडारे, जय बजरंग व्यायाम शाळा अध्यक्ष गजानन जुमडे, माजी सरपंच गजानन उमाळे,मारोती संस्थान अध्यक्ष सुनील जुमडे, जयदिप जुमडे, राजेश जुमडे,प्रमोद खंडारे व गावकरी मंडळी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button