मुख्याध्यापकांच्या कारभाराविरोधात ग्रामस्थ आक्रमक; शाळा कुलूप बंद आंदोलनाचा इशारा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
पिंपरी आंधळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक मल्हारी दत्तात्रय जायभाय यांच्या कारभाराबाबत ग्रामस्थ, पालक व शाळा व्यवस्थापन समितीने आक्षेप नोंदवित त्यांच्या बदलीची मागणी केली आहे. मागण्यांवर २४ ऑगस्टपर्यंत ठोस कार्यवाही न झाल्यास २५ ऑगस्ट रोजी शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात शालेय गणवेश खरेदी प्रक्रियेत शाळा व्यवस्थापन समितीला विश्वासात न घेणे, पोषण आहारामध्ये निकृष्ट दर्जाचा भाजीपाला वापरणे, मुख्याध्यापकांची अनियमित उपस्थिती, अध्यापनाकडे दुर्लक्ष, शालेय निधीच्या वापराबाबत पारदर्शकता नसणे तसेच पालकांशी असभ्य वर्तन केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. याशिवाय शाळेतील पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह व इतर मूलभूत सुविधांकडेही दुर्लक्ष होत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
मुख्याध्यापकांची तातडीने बदली करून त्यांच्या जागी पूर्णवेळ कर्तव्यदक्ष मुख्याध्यापकाची नियुक्ती करावी, तसेच पोषण आहार, गणवेश खरेदी व आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी, अशा मागण्या ग्रामस्थांनी केल्या आह



