बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी मका, बाजारी ही पिके घेतल्यास,शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी अडीच हजारापर्यत अनुदान!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

खामगांव प्रतिनिधी :गजानन तांगडे

खामगांव तालुकामध्ये खरीप हंगामा 2026-27मध्ये मका, बाजारी या पिकांची पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विभागाने अनुदान योजना जाहीर केली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान अन्नधान्य पिके योजने अंतर्गत प्रकल्पा बाहेरील अन्नद्रव्य व्यवस्थापनआणि कीड या बाबींसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी अडीच हजार रुपयापर्यन्त अनुदान मिळणार असुन,
या अनुदानामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाचा काही भार कमी होण्यास मदत होईल. तसेच पिकांमध्ये संतुलित अन्नद्रव्याचा वापर आणि प्रभावी कीड व्यवस्थापनाला प्रोत्साहन मिळणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी कृषी विभागाने निश्चित केलेल्या निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान अन्नधान्य पिकाचे उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येते आहे. आधुनिक तंत्रज्ञान योग्य व्यवस्थापन आणि कीड नियंत्रणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देणे हा योजनेचा उद्देश आहे. लाभार्थी शेतकऱ्याने संबंधित हंगामामध्ये मका किंवा बाजरी पिकाची लागवड केलेली असणे आणि योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे सादर करणे अपेक्षित आहे अनुदानासाठी शासनाने निश्चित केलेल्या अटी शर्ती लागू राहतील.
लाभार्थ्याची संबंधित क्षेत्राची नोंद कृषी विभागाच्या निकषानुसार असणे आवश्यक आहे. मका व बाजरी उत्पादक पात्र शेतकऱ्यांनी योजनेच्या लाभ घ्यावा व आवश्यक कागदपत्रांसह बिले कृषी सहाय्यकाकडे जमा करावी त्यांना अनुदान मिळेल. असे आव्हान संतोष डांबरे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button