श्रीच्या पालखीचे दर्शन करण्यासाठी बाहेर गेले असता, चोरट्यांनी घर केले साफ

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी: गजानन तांगडे खामगांव
श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी घरा बाहेर गेलेल्या कुटुंबाच्या घरातील कपाटामधून सुमारे 1 लाख 20हजार चोरीला गेल्याची घटना बाळापुर फैल परिसरामध्ये 18 ऑगस्ट रोजी उघडकीस आली. याप्रकरणी खामगांव शहर पोलिसांनी संशयित शुभम बबन माटकर वय 29 रा. बाळापुर फैल, खामगांव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रक्षा जाधव वय (26) यांनी बीसी मधून मिळालेले एक लाख वीस हजार रुपये घरातील लोखंडी कपाटामध्ये ठेवले होते. त्या पतीसह पालखीच्या दर्शनासाठी बाहेर पडल्या. दर्शन घेऊन घरी परत आले असता त्याना घरामध्ये चोरी झाल्याचे दिसून आले.त्यानंतर रक्षा जाधव यांनी घरातील कपाटाची पाहणी केली असता त्या कपाटमधील1लाख 20 हजार रुपयांची रक्कम गायब झाल्याचे दिसुन आले. घरात तसेच परिसरात शोध घेतला असता पैसे मिळून आले नाही. घरामध्ये प्रवेश करून कपाटमधील रक्कम चोरून नेलाच्या संशय शुभम माटकर यांच्या वर करण्यात आला.या बाबत जाधव यांनी खामगांव शहर पोलिसांत तक्रार दाखल केली.खामगांव शहर पोलिसानी बी एनएस कलम 305,331(3)भा.न्या.सं अंतर्गत गुन्हा दाखल केला असुन. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हेकाँ.संतोष इटमल्लू करीत आहे.



