बुलढाणा

जि.प. केंद्र शाळेचे मुख्याध्यापक जे. टी. इंगळे सर सेवानिवृत्त – गौरव व निरोप समारंभ उत्साहात..…!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

संग्रामपूर:- ३० मार्च २०२६
शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल ग्रामस्थ व शिक्षक वृंदांनकडून भावनिक निरोप आज दि. ३० मार्च रोजी जिल्हा परिषद केंद्र शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले श्री. जे. टी. इंगळे सर सेवानिवृत्त झाले. त्यांच्या प्रदीर्घ व समर्पित सेवेनंतर शाळेच्या प्रगतीसाठी त्यांनी दिलेल्या मोलाच्या योगदानाची दखल घेत आज त्यांच्या गौरव व निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमात इंगळे सरांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल उपस्थितांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेने शैक्षणिक,सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधल्याचे यावेळी सांगण्यात आले.या प्रसंगी सरपंच भारती ताई अस्वार, चेतन इंगळे सर, टाले सर, धनभर सर, तरोडे मॅडम, साळवे मॅडम यांच्यासह शाळा समिती अध्यक्ष राजेश धुळे, उपाध्यक्ष वनीता लवंगे, सदस्य शितल कोकाटे, वैशाली परचामोर, रेशमा धर्म, दीपक अस्वार, सचिन करांगळे, रामकृष्ण ताडे, दाते सर तसेच शिक्षकवृंद आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी इंगळे सरांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमादरम्यान अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत सरांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला, ज्यामुळे वातावरण भावनिक झाले होते.
कार्यक्रमाच्या शेवटी इंगळे सरांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सर्वांच्या शुभेच्छा व प्रेमाने भारावून गेलेल्या इंगळे सरांनी आपल्या भावना व्यक्त करत सर्वांचे आभार मानले.
गावातील नागरिक व शिक्षकवृंद यांच्या उपस्थितीत पार पडलेला हा निरोप समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण आणि संस्मरणीय ठरला……✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button