बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पिंपरी काथरगावच्या सरपंचा झडकल्या दिल्लीच्या दरबारी…!

स्टार भारत भाई एक्सप्रेस,

प्रतिनिधी संग्रामपूर. रतन भगत.

दि.११/३/२०२६:-संग्रामपूर… सविस्तर वृत्त असे की बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील काथरगाव पिपरी गट ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचा सौ सुवर्णा गणेश टापरे यांची निवड सशक्त पंचायत नेत्री अभियान राष्ट्रीय संमेलन दिल्लीसाठी जिल्ह्यामधून एकमेव भूगोला जिल्हा परिषदेने केले आहे. सो सुवर्णा टापरे यांनी आपल्या ग्रामविकास व सुंदर स्वच्छ गाव यासाठी गावात नेहमीच नवनवीन आणि वेगवेगळ्या प्रकारचेस्तुत उपक्रम राबवून गावात शिक्षण आरोग्य व स्वच्छता यावर विशेष भर देत नाविन्यपूर्ण असे काम केले आहे. त्यांच्या कामाची पावती म्हणून बुलढाणाजिल्हा परिषद ने त्यांची निवड केल्याचे मिळाले आहे. त्यांच्या ग्रामपंचायतीला वित्त आयोगाचा निधी नसतानाही त्यांनी गावाचा विकास घडविण्यासाठी मेहनत घेतली आणि सतत त्या गावाचा विकास करण्यासाठी नेहमी धडपडत राहिल्या. गावातील शाळा अंगणवाड्या सर्वांगाने सुंदर राहण्यासाठी सतत कार्यरत राहिल्या गोद्री मुक्त गाव अभियान व्यसनमुक्त दारूबंदी असे विविध कार्यक्रम राबवून गाव स्वच्छ व सुंदर असे केले त्यांच्या या विविध कार्याचा मागवा घेत सशक्त पंचायत नेत्री अभियान राष्ट्रीय संमेलन दिल्ली येथे त्यांना गौरविण्यात आले , व त्यांना आपले विचार मांडण्याची संधी सुद्धा दिल्ली येथे मिळाली. याच सर्व श्रेय त्या आपल्या गावकऱ्यांना आणि सहकार्याने देतात तसेच ग्रामपंचायत सर्व कर्मचाऱ्यांना सुद्धा याचे श्रेयते देतात. काथरगाव च्या सरपंचा सौ सुवर्णा टापरे यांनी ११ मार्च रोजी दिल्ली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये आपली यशोगाथा मांडली आहे. त्यांच्या याच कार्यामुळे संपूर्ण संग्रामपूर तालुक्यामध्ये त्यांचे कौतुक होत आहे…..

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button