Uncategorized

राहुरी तालुक्यात बिबट्यांचे मानवा वरील हल्ले चिंताजनक वन विभागाला गांभीर्य नसल्याने जनतेत संताप

राहुरी प्रतिनिधी दत्ता जोगदंड राहुरी तालुक्यात बिबट्यांचे मानवावरील वाढलेले हल्ले चिंताजनक आसुन आतापर्यंत तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यात एका बालिकेचा बळी तर अनेक शेतकरी शाळकरी मुले महिला गंभीर जखमी झाले आहेत तालुक्यातील ग्रामीण भागात गाव तेथे बिबटे अशी अवस्था झाली असून वन विभागाला मात्र याबाबत गांभीर्य नसल्याने ग्रामीण भागातून संताप व्यक्त होत आहे गेल्या वर्षापासून राहुरी तालुक्यात बिबट्याचा मोठ्या प्रमाणावर संचार वाढला असून प्रत्येक गावात बिबट्यांचे भर दिवसा दर्शन नित्याचे झाले आहे बिबट्याने थेट माणसांना व लहान मुलांना लक्ष केल्याने ग्रामीण भागात या बिबट्यांची मोठी दहशत निर्माण झाली आहे जातप वरवंडी व व पर्वता रबा देते तर बिबट्याने लहान मुलावर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत वरवंडी येथील वेदिका ढगे या चार वर्षाच्या बालिकेला तर सकाळच्या सुमारास घरांच्या अंगणात खेळत असताना बिबट्याने उचलून नेऊन ठार केले होते तसेच येथील ढगे दापत्य दुचाकीवरून जात असताना झडप घालून दापत्याला जखमी केल्याची घटना घडली होती यावेळी मोठं असंतोष निर्माण झाल्याने वन विभागाने पिंजरा लावून बिबट्या जेर बंद केला होता जातपीतील मयूर बोंबले या बालकावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते कोंडवड परिसरात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी अरबाज पठाण व अमोल सरोदे हे दुचाकीवरून जात असताना बिबट्याने हल्ले केले तसेच चिंचोली येथील मच्छिंद्र पठारे व राहुरी खुर्द येथील खंडेराव शेटे या शेतकऱ्यांनी रात्री शेतीला पाणी देत असताना बिबट्यांशी झुंज देऊन आपला जीव वाचवला दरम्यान आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या पाळीव प्राणी कुत्रे मेंढपाळाचे शेळ्या मेंढे मोठ्या प्रमाणावर या बिबट्यांनी फस्त केले आहेत काही ठिकाणी तर हे बिबटे सहकुटुंब वाड्यावर वस्त्यावर येऊन हल्ले करीत आहेत वनविभागांनी जनतेच्या समाधानासाठी पिंजरे लावली मात्र पिंजऱ्यात एकदा जाऊन आलेला बिबट्या या पिंजऱ्यापासून दूर राहतो असे चित्र दिसत आहे या पिंजऱ्याचा गंध व रंग बिबट्यांना ओळखीचा वाटत असल्याची शंका काहींनी उपस्थित केली आहे यासाठी पिंजरे निर्जंतुकीकरण व नवीन रंग देऊन लावले तरच बिबट्या अडकतील असे काहींनी मत व्यक्त केले आहे तरी वनविभाग आणि मानवावर होणाऱ्या बिबट्यांच्या हल्ल्याचे गंभीर्य लक्षात घेऊन गावात बिबटे जेर बंद करण्यासाठी एक मोठी मोहीम राबवावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button