महाराष्ट्रविदर्भ

“रिठद येथे खासदार संजय देशमुख यांची रिसोड दौऱ्यात रिठद उपकेंद्रांमध्ये महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक”

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

रिसोड : – वाशिम यवतमाळ मतदार संघाचे खासदार संजय देशमुख यांचा रिसोड मालेगाव मतदार संघात रिसोड येथे सत्कार समारंभ व कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. दरम्यान वाशिम ते रिसोड रस्त्यावर रिसोड तालुक्यात रिठद पासून रिसोड मतदार संघाची सुरुवात होते. दरम्यान रिठद येथे संत गजानन महाराज यांच्या मंदिरात ऋषिपंचमीनिमित्त प्रसादाचे वाटप चालू होते.संत गजानन महाराज मंदिरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख नारायण आरु, रिसोड विधानसभा समन्वयक सुभाष बोरकर, शाखाप्रमुख गंगाधर आरु, शिवसेनेचे उपसभापती राजू आरू यांचे सुपुत्र शुभम आरू यांनी संजय भाऊ देशमुख यांचे शाल व पुष्पहार घालून मंदिरामध्ये स्वागत केले. यावेळी जिल्हाप्रमुख सुरेश भाऊ मापारी, महाविकास आघाडीचे समन्वयक बाळासाहेब देशमुख, माजी उपसभापती विठ्ठल आरू, डॉ. यु.टी. बोरकर, गजानन महाराज मंदिर समितीचे दिनकर बोरकर, आत्माराम पाटील आरु,लक्ष्मण ठोकळ, बळीराम बोरकर, प्रकाश बोरकर, नंदू आरु, ज्ञानेश्वर खानझोडे,आनंदा काळे इत्यादी गावातील अनेक मान्यवर मंडळी सत्कारानिमित्त हजर होती.तर परतीच्या प्रवासात रिठद येथील उपकेंद्राबाबत काही समस्या होत्या, त्यासाठी उपकेंद्रात तांदळी, मोहजारोड, सावरगाव जिरे,रिठद येथील शेतकरी रिठद विद्युत उपकेंद्रात खासदार संजय देशमुख यांच्या समक्ष समस्या मांडण्यासाठी ठिय्या मांडून बसले होते.यामध्ये जिल्हा परिषद सदस्य दिलीपरावजी देशमुख हिवरा देशमुख, माजी सभापती गजानन भोने सावरगाव जिरे, पुरुषोत्तम सरनाईक माजी सरपंच मोहजारोड,रिठद येथील शिवसेना तालुकाप्रमुख नारायण आरु, सुभाष बोरकर विधानसभा समन्वयक, गजानन नायक यांच्या सह अनेक शेतकरी उपस्थित होते.समस्या अशा होत्या कि ३.५ चा MVA(रोहीत्र) जळालेल्या अवस्थेत नोव्हेंबर पासून आहे.तो अद्यापही दुरुस्ती केला नाही.त्यामुळे येणाऱ्या रब्बी हंगामात शेतीसाठी दुसऱे रोहीत्र आहे .त्यावर लोड येणार, त्यामुळे विद्युत पुरवठा सुरळीत चालणार नाही.आणी गावठाणची लाईट मालेगाव वरुन सतत जात असल्याने व ३३के.व्ही.हि लिंक लाईन येणारी मालेगाव वरुन आहे.वारंवार बंद पडत आहे.आणी विद्युत पुरवठा खंडित होत आहे.याबाबत खासदार संजयभाऊ देशमुख यांनी महावितरणचे अकोला C.E.आणी वाशिम चे A C यांचेशी संपर्क मोबाईल वरुन साधून हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले.तर स्थानिक जागेवर सह अधिक्षक मिसाळ सोबत उपविभागीय अभियंता , कनिष्ठ अभियंता देशमुख उपस्थित होते.हि कामे लवकर करुन घेण्यासाठी काळजी करण्याचे खासदार संजयभाऊ देशमुख यांनी सांगितले,आणी सर्व लाईनमन स्टा‌ॅप आणखी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button