Uncategorized

पोषण आहार बाळासाठी अमृत त्याचे सेवन व्यवस्थीत करा

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव :- प्लान इंडिया, जिल्हा परिषद वाशीम, आरोग्य विभाग आणि आय सी डी एस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १ सप्टेंबर २०२४ पासून पोषण ते ३० सप्टेम्बर पर्यन्त मालेगांव तालुक्यात पोषण आहार नियोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
पोषण आहार हा मातासांठी व बाळांसाठी अमृत असून याचे योग्यनोजन करा असे आवाहन यावेळी प्लॅन इंडिया व आरोग्य. वी़भागाच्या वतीने करण्यात आले आहे . मालेगाव तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये यशस्वीपणे हे अभियान राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमामध्ये पोषण, अतिसार व्यवस्थापन , न्यूमोनिया, अनिमिया तसेच माता आणि बाल आरोग्य या विषयांवर लाभार्थी व उपस्थित सहभागी यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ अश्विनी खासबागे तालुका वैद्यकीय अधिकारी , मदन नायक बाल विकास अधिकारी मालेगाव तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी, समुदाय वैद्यकीय अधिकारी आणि प्लान इंडिया च्या सेल्फ केअर फॉर न्यू मॉम्स किड्स अंडर ५ टीमचे दिनेश प्रजापती स्टेट मैनेजर महा, सुरज पवार प्रकल्प समन्वयक, भूषण कोल्हे तालुका अधिकारी सर्वांच्या सहकारी मार्गदर्शन करीत आहे. तसेच सेल्फ केअर टीमच्या सी.एच.डब्ल्यू शुभा इंगळे, शीतल नागले, वैष्णवी नरवाडे, मोहिनी उईके, काजल राठोड ह्या कार्यक्षेत्रातील समस्त समुदाय वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी सेविका, ए,एन,एम, आशा सेविका व अन्य सर्व आरोग्य कर्मचारी सह प्रभावीपणे कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे.
कार्यक्रमा दरम्यान उपस्थित लाभार्थ्यांना पोषणाचे महत्त्व, स्वच्छतेच्या सवयी, अतिसार व्यवस्थापन, गरोदरपणात घ्यावयाच्या काळजी आणि मुलांचे व मातांचे आरोग्य राखण्यासाठी आहाराचे महत्व यावर सखोल माहिती देण्यात येत असून सदर कार्यक्रम ३० सेप्ट २०२४ पर्यत तालुक्यातील गाव खेड्यात चालणार आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button