हितेश दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा; आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

बोदवड येथे हितेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कार्यक्रम; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
बोदवड | प्रतिनिधी
मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राचे शिवसेना क्षेत्रप्रमुख तसेच जीवनविकास शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष आणि मलकापूर येथील प्राचार्य हितेश (दादा) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (दि. २६ जुलै) बोदवड येथील मुक्ताई मंगल भवन येथे अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, शिवसैनिक, भीमसैनिक, महिला भगिनी तसेच तालुका आणि जिल्हाभरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांनी हितेश पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व जनसेवेतील कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना आमदार चंद्रकांत पाटील यांनी हितेश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या भावी वाटचालीसाठी उज्ज्वल भविष्य, उत्तम आरोग्य आणि यशस्वी सार्वजनिक जीवनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. मतदारसंघातील शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांची सेवा भविष्यातही अशाच निष्ठेने सुरू ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या सोहळ्याचे आयोजन हितेश पाटील यांचे ज्येष्ठ बंधू मनोहर पाटील (येवती), एचपी फाउंडेशन तसेच मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी हितेश पाटील यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.



