अंतुर्ली पोलीस दूरक्षेत्राच्या भेटीत पोलीस कर्मचाऱ्यांकडून नंदराज पाटील यांचा सत्कार

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर उपविभागाचे नवनियुक्त उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या अंतुर्ली पोलीस दूरक्षेत्राला सदिच्छा भेट दिली. यावेळी अंतुर्ली दूरक्षेत्रातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत केले.या प्रसंगी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी नवनियुक्त उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच पोलीस दलातील समन्वय, शिस्त आणि प्रभावी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली उत्तम कार्य होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.यावेळी पोलीस अंमलदार पवन सपकाळ, विजय पठार, मुकेश महाजन, राजेश महाजन, संदीप खवळे, राहुल तायडे, अमोल जाधव यांच्यासह अंतुर्ली पोलीस दूरक्षेत्रातील कर्मचारी उपस्थित होते.



