संत नगरी शेगावात श्री क्षेत्र सिध्दपीठ, बाळापुर रोड येथे श्री गजानन महाराज मतिमंद विद्यालयाचे परिसरात भव्य मंदिराचे निर्माण करण्यात आले.

*संत नगरी शेगावात श्री क्षेत्र सिध्दपीठ, बाळापुर रोड येथे श्री गजानन महाराज मतिमंद विद्यालयाचे परिसरात भव्य मंदिराचे निर्माण करण्यात आले.*
स्टार भारत लाईव्ह वृत्त प्रतिनिधी मिलिंद चराटे
संत नगरी शेगावात श्री क्षेत्र सिध्दपीठ, बाळापुर रोड येथे श्री गजानन महाराज मतिमंद विद्यालयाचे परिसरात भव्य मंदिराचे निर्माण कार्य झाले असुन श्री संत मंहतांचे शुभ हस्ते महालक्ष्मी मुर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलश रोहन सोहळा २४ जानेवारी ते २८ जानेवारी पर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे. श्री क्षेत्र सिध्दपीठ, शेगांव येथे दि. २४ जानेवारी ते २८ जानेवारी दरम्यान श्री सिध्द महालक्ष्मी मुर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलश रोहण सोहळा. संतांचे उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे. २४ जानेवारी रोजी सिध्दपिठ परिसरातून सकाळी ७ वाजता ध्वज मुर्तीची रथयात्रा निघेल, देवीस रसाधीवास तसेच रात्री ८ ते १० ह.भ.प. साध्वी सोनाली दिदी करपे यांचे किर्तन होईल. २५ जानेवारी देवीस हवन, पुष्पाधिवास यथाविहीत स्वाहाकार तसेच रात्री ८ ते १० ह.भ.प.श्री प्रशांत महाराज ताकोते यांचे किर्तन होईल. दि. २६ जानेवारी देवीस अन्नाधिवास, देवीस शय्याधिवास तसेच रात्री ८ ते १० ह.भ.प. युवा किर्तनकार भारतीताई आळसुळआळंदी देवाचीयांचे किर्तन होईल. २७ जानेवारी ला विविध संतश्रेष्ठींचे शुभहस्ते सिध्दमहालक्ष्मी मुर्तीची प्राणप्रतिष्ठा व ध्वज कळस रोहण दुपारी १ वाजून ४७ ला होईल, नंतर पुर्णाहुती, आरती, मंत्रशिर्वाद. इ. कार्यक्रम होतील. रात्री ८ ते १० हभप श्री गजानन महाराज (क्रियायोगी) वाघ सिध्दपिठाचार्य यांचे किर्तन होईल. २८ जानेवारीला श्री सिध्द महालक्ष्मीचे कुंकुम अर्चन, हिरण्यअर्चन होईल. सकाळी १० वाजता हभप महंत भास्करगिरी महाराज श्री क्षेत्र देवगड यांचे गोपाल काल्याचे किर्तन व महाप्रसाद वितरण होईल. तरी या उत्सवात हजर राहुन श्री सिध्द महालक्ष्मी देवीचे आशिर्वाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे स्वयंसिद्ध, आवाहन हभप क्रियायोगी श्री गजानन महाराज वाघ संस्थापक श्री क्षेत्र सिध्दपिठ शेगांव तर्फे करण्यात आले आहे. सदर उत्सवाची पुर्व तयारी आविष्कारसांस्कृतिक सामाजिक व अपंग विकास संस्था नागपुचे संचालक मंडळ व सिध्दपिठ परिवारा तर्फे करण्यात येत आहे. या उत्सवातील हवन, अन्नदान, गौसेवा, दिव्यांग सेवा इ. विविध उपक्रमात भाविक सहभागी होऊ शकतात या करिता सिध्दपीठाशी भाविकांनी संपर्क साधावा. अनौपचारिक समारंभात अंबादास मांडवगडे नंदकीशोर भावारे, केशव हिंगणे. उपस्थित होते. अशी माहिती गजानन मुंढे प्राचार्य श्री गजानन महाराज निवासी मतिमंद, विद्यालय शेगांव यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली .



