बुलढाणामहाराष्ट्र

शेतकऱ्याच्या कर्जमुक्ती करिता तेल्हारा तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने विश्रामगृह तेल्हारा येथे तालुका निहाय आढावा बैठक संपन्न.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

तालुका प्रतिनिधी :- संतोष गिऱ्हे

तेल्हारा :- विश्रामगृह येथे प्रहार जनशक्ती पक्ष तेल्हारा तालुका व शहर याची आढावा बैठक ठेवण्यात आली होती बैठकीमध्ये शेतकरी कर्जमाफी,शेतमजूर, दिव्यांग अपंग,मेंढपाळ,मच्छीमार,यांच्या विविध मागण्यांसाठी सन्माननीय बच्चुभाऊ कडू हे मागील तीन महिन्यापासून सर्वसामान्य जनतेच्या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य व्हाव्या याकरिता आंदोलन करीत आहेत परंतु शासन ठोस निर्णय घेत नाही आहे. म्हणून येणाऱ्या 24 तारखेला संपूर्ण महाराष्ट्र मध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन होणार आहे या आंदोलनामध्ये शेतकरी,शेतमजूर, या सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्ष तेल्हारा तालुका व शहर यांच्या वतीने तेल्हारा ठाणेदार यांना आंदोलनाचे निवेदन देण्यात आले यावेळी तालुक्यामधील प्रहार जनशक्ती पक्षाचे ज्येष्ठ मार्गदर्शक
राजू खारोडे व प्रहार जनशक्ती पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button