शेतकऱ्यांच्या हक्कासाठीशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रस्त्यावर;देऊळगाव राजात धरणे आंदोलनघोषणांनी दणाणला बसस्थानक चौक;कर्जमाफी, पीकविमा व वीज-पाणी प्रश्नांवर सरकारला इशारा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:– शंकर शिवरकर
देऊळगाव राजा : शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने देऊळगाव राजा येथील बसस्थानक चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर तहसीलदार यांना निवेदन देऊन शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या विविध मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, यांनी बोलताना आश्वासन दिले की शासनकडे नक्की आम्ही पाठपुरावा करू
निवेदनात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणे, प्रधानमंत्री पीक विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) विहिरींचे रखडलेले अनुदान वितरित करणे, घरकुल योजनांचे थकीत हप्ते अदा करणे तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांतील लाभार्थ्यांना पूर्वसंमती व अनुदान तत्काळ देण्याची मागणी करण्यात आली.
याशिवाय ग्रामीण भागात नियमित वीजपुरवठा करणे, अपूर्ण पाणीपुरवठा योजना पूर्ण करणे, गावागावांतील जोडरस्त्यांचे नूतनीकरण करणे, शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात खत उपलब्ध करून देणे, रेशनधारकांना धान्याचे नियमित वितरण करणे तसेच वाढत्या इंधन दरांवर नियंत्रण आणण्याची मागणीही करण्यात आली.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वतीने तहसीलदार वैशाली डोंगर जाळ, ठाणेदार ब्रह्मगिरी,तसेच कृषी अधिकारी,MACB प्रतिनिधी यांना निवेदन देण्यात आले
(विशेष या धरणे आंदोलनास स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांनी भेट देऊन आंदोलन कर्त्यांना निवेदनाच्या ठोस पावलं उचलण्याची आश्वासन दिले मंडपात स्वतः येऊन त्यांनी शेतकऱ्यांचे वेदना जाणून आश्वासन दिले)
यावेळी पोलीस बंदोबस्त चोख होता आंदोलन शांतते पार पडले कोणतेही अघटीत घटना घडली नाही
तालुका प्रमुख दादाराव खराडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी शासनाच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकरी प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली.
या प्रसंगी वसंत आप्पा खुळे, संभाजी शिंदे, शांताबाई सानप, नितेश देशमुख, अजय शिवरकर, राजीव नागरे, अविनाश डोईफोडे, स, सुनील खेडेकर, विठोबा पवार, संदीप शिंदे, किशोर दमदार, नागेश कराड यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
“शेतकऱ्यांच्या न्यायासाठी शिवसैनिक आक्रमक; मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा”, असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.



