
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे प्रतिनिधी
खामगाव दि. ३१ ; समाजकार्याची आवड असलेले तथा पत्रकारिता क्षेत्रात रुची असलेले जनुना (तलाव) खामगाव येथील रहिवाशी श्री गजानन देविदासजी रोकडे (जी.डी.रोकडे) यांनी आपल्या कार्यातून अपंग , विधवा ,परितक्त्या , शालेय विद्यार्थी, गोरगरीब अशा पूर्ण खामगाव तालुक्यातील अद्याप पर्यंत तब्बल ११०० हून अधिक नागरीकांना शासकीय योजनांचा , लाभ मिळवून देण्यास मदत केली त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत सामाजिक ,साहित्यिक ,सांस्कृतीक, क्रीडा ,तसेच देशातील पत्रकार व समाज बांधवांच्या न्याय व हक्कासाठी लढणारे एकमेव असलेले राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ ( गव्ह.ऑफ इंडिया ,निती आयोग ,मान्यता प्राप्त) यांनी रविवार दि.२८ जानेवारी २०२४ रोजी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री विजय सूर्यवंशी , श्री.संतोष जाधव अध्यक्ष महा.राज्य , श्री.दशरथ रोडे कार्याध्यक्ष महा. राज्य व श्री.निलेश ठाकरे सचिव महा. राज्य यांच्या आदेशाने विदर्भ अध्यक्ष प्रखर प्रहार चे संपादक श्री.किरण मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष श्री. विश्वास कंकाळ यांच्या हस्ते श्री गजानन रोकडे यांची खामगाव तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी खामगाव , शेगाव , संग्रामपूर , नांदुरा , बुलढाणा येथील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. श्री गजानन रोकडे यांच्या नियुक्तीनंतर त्यांच्यावर सर्वच स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



