Uncategorizedखानदेशजळगावजळगावा जिल्हाबोदवडभुसावळ

शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीला वेग; मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात नव्या नियुक्त्या जाही

शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीला वेग; मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात नव्या नियुक्त्या जाहीर

उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नितीन गोसावी विधानसभा संघटक तर ॲड. राहुल पाटील तालुका प्रमुखपदी नियुक्त मुक्ताईनगर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला गती देण्यासाठी रावेर लोकसभा जिल्ह्यात महत्त्वपूर्ण नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच उपनेते संपर्क प्रमुख गुलाबरावजी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली या नियुक्त्या करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रमुख योगीराज गबाजी पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.यानुसार, नितीन बळीराम गोसावी यांची विधानसभा क्षेत्रप्रमुख तथा विधानसभा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली असून, ॲड. राहुल अशोक पाटील यांच्यावर तालुका प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.दोन्ही पदाधिकाऱ्यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. आगामी काळात पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच शिवसेनेचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी हे पदाधिकारी प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.सामान्य जनतेचे प्रश्न सोडविणे, पक्ष संघटना अधिक बळकट करणे आणि आगामी राजकीय घडामोडींमध्ये सक्रिय सहभाग नोंदविणे, अशी अपेक्षा नव्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.दरम्यान, सर्व शिवसैनिकांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हा प्रमुख योगीराज गबाजी पाटील यांनी केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button