खानदेशजळगावा जिल्हाबुलढाणामुक्ताईनगरराजकीय

शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांची निवड; सोशल मीडिया माध्यमातून पक्षविचार जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी

मुक्ताईनगर :

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे तसेच युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विचार, पक्षाची भूमिका, ध्येय-धोरणे आणि जनहिताचे प्रश्न सोशल मीडिया व डिजिटल माध्यमातून जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी रावेर लोकसभा क्षेत्रात संघटनात्मक जबाबदाऱ्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

पक्ष नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना उपनेते व नंदुरबार लोकसभा आणि रावेर लोकसभा संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा समन्वयक तथा माजी नगरसेवक प्रल्हाद महाजन, रावेर लोकसभा जिल्हाप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक योगीराज पाटील, रावेर लोकसभा जिल्हाप्रमुख ॲड. चंद्रकांत शर्मा, जिल्हा उपसंघटक अशोक शिंदे, रावेर तालुका प्रमुख प्रमोद कोंडे, मुक्ताईनगर तालुका प्रमुख ॲड. राहुल पाटील यांच्यासह जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून या नियुक्त्या करण्यात आल्या.

जळगाव जिल्हा (रावेर लोकसभा क्षेत्र) डिजिटल सोशल मीडिया समन्वयक म्हणून शिवसैनिक जयवंत प्रभाकर चौधरी (राजपूत) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मुक्ताईनगर तालुका संघटक म्हणून अक्षय अरुण पालवे, तर रावेर तालुका महिला आघाडी प्रमुख म्हणून भारती स्वप्निल महाजन यांची निवड करण्यात आली.

या नव्या जबाबदाऱ्यांच्या माध्यमातून पक्षाची अधिकृत भूमिका, नागरिकांच्या प्रश्नांवरील भूमिका, जनहिताचे मुद्दे तसेच शासन-प्रशासनाशी संबंधित विषय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून जनतेसमोर मांडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कायदा-सुव्यवस्थेच्या चौकटीत सोशल मीडिया वापरावर भर

डिजिटल माध्यमांचा प्रभाव वाढत असताना पक्षाच्या विचारांचा प्रचार-प्रसार करताना कायदा, संविधानिक मूल्ये आणि सामाजिक सलोखा यांचे भान राखणे महत्त्वाचे ठरणार आहे. जनहिताचे प्रश्न मांडताना तथ्यांची पडताळणी, जबाबदार भाषेचा वापर आणि अफवा अथवा अपप्रचाराला थारा न देणे, ही सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांसमोरील महत्त्वाची जबाबदारी असेल. कायदा-सुव्यवस्था, नागरिकांच्या मूलभूत समस्या, प्रशासनातील त्रुटी आणि जनतेच्या तक्रारी याबाबत आवाज उठविताना संबंधित यंत्रणेकडे कायदेशीर व लोकशाही मार्गाने पाठपुरावा करण्यावर भर देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यामुळे राजकीय प्रचारासोबतच जबाबदार डिजिटल संवाद आणि जनहिताचा अजेंडा पुढे नेण्याचे आव्हान नव्या पदाधिकाऱ्यांसमोर आहे.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे समस्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या परिवारातर्फे अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या पुढील संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button