विजय शहा यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा!

मुक्ताईनगर – आज सकल मुस्लिम समाज मुक्ताईनगर यांच्या तर्फे राष्ट्रपती भारत सरकार यांना
निवेदन देण्यात आले त्यात सविस्तर वृत असे की सोमवार दिनांक 12 रोजी मध्यप्रदेश चे इंदौर मधील महू तालुक्यातील रायकुंडा गावा मध्ये आयोजित हेलमा या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी चे मंत्री विजय शाह यांनी देशाच्या सन्मानासाठी, कर्नल सोफिया कुरेशी यांनी पाकिस्तानविरुद्ध केलेल्या कारवाईचे संपूर्ण देश कौतुक करत आहे आणि त्यात आपल्या पंतप्रधानांचे मोठे योगदान होते.शौर्यसाठी आणि सुरक्षिततेसाठी जीव ओवाळून टाकणाऱ्या कर्नल सोफिया कुरैशी बद्दल भाजप नेते आणि आपल्या मध्य प्रदेश सरकारचे मंत्री विजय शाह यांनी आपल्या भारताच्या थोरल्या कन्येला/बहिणीला दहशतवादी पाकिस्तानची बहीण असे संबोधून टीका केली आहे.यांचा अपमान केला व त्यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य केले.तसेच घाणेरडे शब्द वापरले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यांच्या भाषणादरम्यान, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या प्रादेशिक खासदार आणि केंद्रीय मंत्री सावित्री ठाकूर आणि आमदार उषा ठाकूर यांनीही आमदार शाह यांना टाळ्या वाजवून प्रोत्साहन दिले.
कारण मंत्री विजय शाह यांनी केवळ कर्नल सोफिया कुरैशी यांचाच नव्हे तर संपूर्ण भारतीय सेनेचा अपमान केला आहे,तरी आम्ही आज सकल मुस्लिम समाज मुक्ताईनगर तर्फे मंत्री विजय शाह यांचा जाहीर निषेध करून मंत्री विजय शाह यांच्यावर देशद्रोह आणि आयटी क्षेत्राशी संबंधित गुन्ह्यांचा गुन्हा दाखल करून त्यांना ताबडतोब अटक करावी.असे मागणीचे निवेदन देण्यात आले यावेळी जळगांव जिल्हा मुस्लिम मणियार बिरादरी चे जिल्हा उपाध्यक्ष हकीम चौधरी, शकील खाटिक सर, अ.रशीद बागवान, शेख लाल शेख मुनीर, अहमद ठेकेदार, रिजवान चौधरी आदि उपस्थित होते.



