Uncategorized

किसान मोर्चा तर्फे राज्यव्यापी आंदोलना संदर्भात दिले

सोयाबीन, ज्वारी, कडधान्य, कापूस, पिकांना हमीभाव ,पीक विमा, शेतकऱ्यांना 24 तास व मोफत वीज मिळावी यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चा तर्फे राज्यव्यापी आंदोलना संदर्भात दिले निवेदन :-
अतिवृष्टीमुळे देशभरातील शेतकरी संकटात असताना सरकार मात्र शेतकऱ्यांना कुठलेही मदत करताना दिसत नाही कुठल्याही सरकारने अद्याप पर्यंत स्वामीनाथन आयोग लागू केलेला नाही तसेच ईरमा कायदा सुद्धा आज पर्यंत कुठल्याही सरकारने लागू केलेला नाही
महाराष्ट्र सरकारकडून सोयाबीन कापूस यासह इतर शेतमालाला पर्याप्त हमीभाव न देणे शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी 24 तास मोफत वीज पुरवठा न करणे व प्रधानमंत्री पिक विमा योजना रद्द करून आर आय एम ए इरमा कायद्यावर आधारित पिक विमा अथवा सबसीडी ची अंमलबजावणी न करणे अशाप्रकारे महाराष्ट्र सर्व देशभरातील शेतकऱ्याला कायम अडचणीत आणले जात असल्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रभर तहसील कार्यालयावर राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले त्याच अनुषंगाने आज मुक्ताईनगर राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष कैलास रामभाऊ पाटील यांच्या नेतृत्वात मुक्ताईनगर तहसीलदार यांना सुद्धा निवेदन देण्यात आलेले आहे या निवेदनात राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय किसान मोर्चा तर्फे देण्यात आलेला आहे याप्रसंगी बहुजन मुक्ती पार्टीचे राज्य संघटक प्रमोद सौंदळे, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क जिल्हाध्यक्ष अरुण जाधव, राष्ट्रीय बेरोजगार मोर्चाचे तालुकाध्यक्ष सुपडा हिरोळे, एन एन टी एम चे तालुका अध्यक्ष शांताराम बेलदार, उद्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ हिरोळे ,व इतर शेतकरी शेतकरी बांधव उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button