वारकरी बाल सुसस्कार शिबिरास सुरुवात संग्रामपूर तालुक्यातील काकनवाडा (बु )

वारकरी बाल सुसस्कार शिबिरास सुरुवात संग्रामपूर तालुक्यातील काकनवाडा (बु )
( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी निलेश मेहेंगे )
येथील श्री त्र्यंबकेश्वर संस्थान मंदिरात यावर्षी प्रथमच वारकरी बाल सुसंस्कार शिबिर सुरू झाले आहे हभप श्रीकृष्ण महाराज रावणकार हे ५ मे रोजी सुरू झालेल्या शिबिरातून २५ मे २०२४ यादरम्यान मुलांना भागवत धर्मोय शिक्षणाची जडणघडण करण्यास मदत व्हावी म्हणून शिबिरादरम्यान श्रीमद् भागवत गीता अध्याय १२ व १५ श्री ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ अभंग मृदंग टाळ गायन पावल्या व अभंगांच्या चाली व दैनिक आचरण अशाप्रकारे शिबिरातील दिनचर्येला सकाळी ७ वाजता सुरुवात होऊन शेवटी संध्याकाळी ७ वाजता श्री त्र्यंबकेश्वर मंदिरातील आरती आदीसह अनेक विषयावर श्रीकृष्ण महाराज रावणकार हे बाल सुसंस्कार शिबिरास मार्गदर्शन करत आहेत या कार्यक्रमाचे आयोजक काकनवाडा बुद्रुक येथील श्री त्र्यंबकेश्वर संस्थान पंच मंडळ व समस्त गावकरी मंडळी आहेत



