बुलढाणा

रोजगार मेळावा जिल्हाधिकारी कार्यालय परिसर अकोला येथे दि. 8 रोजी 211 पदांसाठी भरती प्रक्रिया

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ता.प्र.

अकोला,(जिमाका)- पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय अकोला परिसरात गुरुवार दि. 8 जून रोजी आयोजित करण्यात आले आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मेळाव्यात 211 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. पात्रताधारक इच्छुकांनी   संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे यांनी केले आहे.
मेळाव्यात सहभागी उद्योजक याप्रमाणे-

  1. जसनागरा पब्लीक स्कुल, रिधोरा ता.जि.अकोला, 2. अक्षत इंटरप्रायजेस, गोकुल कॉलनी, अकोला, 3. इनोट्रो मल्टीसर्व्हीसेस, अकोला, 4. महिंद्रा ॲण्ड महिंद्रा लि.पुणे, 5.धुत ट्रान्समिशन प्रा.लि.छत्रपती संभाजी नगर, 6. पिपल ट्री ऑनलाईन,पुणे येथे एकूण 211 पदाकरिता भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.  हा रोजगार मेळावा गुरुवार दि.8 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळात जिल्हाधिकारी कार्यालय परिसर अकोला येथे होणार आहे. पात्र व  इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा, शैक्षणिक कागदपत्रे, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो सह स्वखर्चाने उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 0724-2433849 अथवा भ्रमणध्वनी क्रमांक 9665775778 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button