राजेश भाऊ ऐकडे यांचा विद्यार्थी साठी मोठा निर्णय

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलढाणा जिल्हा ग्रामिण प्रतीनीधी ऋषिकेश देठे
💥जिल्ह्यातील पात्र विद्यार्थी विद्यार्थिनींनी महा ज्योती योजनेचा लाभ घेतात ही स्वागतार्ह बाब असली तरी या लाभार्थ्यांमध्ये मलकापूर मतदारसंघातील विद्यार्थी संख्या नगण्य आहे तरी मलकापूर विधानसभा मतदारसंघातील लाभार्थी सुद्धा या योजनेत वाढले पाहिजे त्या दृष्टीने मतदारसंघातील विद्यार्थी विद्यार्थिनी सजग असले पाहिजे असे आवाहन आमदार राजेश एकडे यांनी टॅब वितरण प्रसंगी केले.
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती व समाज कल्याण बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने MH- CET, JEE, NEET, विद्यार्थ्यांना मोफत टॅब चे वितरण स्थानिक वि.भी.कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यात आले. याप्रसंगी आमदार राजेश एकडे, समाज कल्याण उप आयुक्त अनिता राठोड, डॉ. अरविंद कोलते, प्रा.अनिल खर्चे, बंडूभाऊ चौधरी, राजू पाटील, सुधीर पाचपांडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार राजेश एकडे म्हणाले की, सरकारने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महाज्योती अंतर्गत ऑनलाइन शिक्षणाकरिता टॅबची उपलब्धता करून दिली. जे विद्यार्थी त्यात घेऊ शकत नाही अशांकरिता ही व्यवस्था करण्यात आली आहे. योजनेच्या लाभाकरिता पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करून टॅब मिळवता येते. या प्रक्रियेनुसार जिल्ह्यातील ४५० विद्यार्थ्यांना टॅब मिळवता आले. तर या लाभार्थ्यांमध्ये मलकापूर विधानसभा मतदारसंघातील केवळ नऊच विद्यार्थी लाभार्थी ठरले. अर्थात मतदार संघातील इतर विद्यार्थ्यांनी अर्जच केले नसल्याची बाब समोर आली आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून प्रत्येक गरजवंत विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेत ऑनलाइन शिक्षणाच्या दृष्टीने मोफत रित्या मिळणारे टॅब मिळवले पाहिजे. तसेच जास्तीत जास्त पदवीधारकांनी जे स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत त्यांच्याकरिता सुद्धा महाजुतीने सहा महिन्यांचा अभ्यासक्रम मोफत उपलब्ध करून दिला आहे या अभ्यासक्रमाचा सुद्धा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करून प्रवेश मिळवीत लाभ घ्यावा असे आवाहन सुद्धा आमदार एकडे यांनी केले.



