मुक्ताईनगर बसस्थानकावरील दुर्लक्ष – नियमित चौकशी व दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित न झाल्यास आंदोलनाचा इशारा

मुक्ताईनगर प्रतिनिधी
मुक्ताईनगर बसस्थानकावरील दुर्लक्ष – नियमित चौकशी व दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित न झाल्यास आंदोलनाचा इशारा
मुक्ताईनगर │
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी, महिला व शेतकऱ्यांसाठी जीवनवाहिनी मानली जाते. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नियमांनुसार प्रत्येक बसस्थानकावर प्रवाशांना मार्गदर्शन, तक्रारी नोंदविण्यासाठी स्वतंत्र चौकशी कक्ष तसेच कार्यरत दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. परंतु मुक्ताईनगर बसस्थानकात ही मूलभूत सुविधा केवळ कागदावरच असल्याचे वास्तव वारंवार प्रवाशांच्या अनुभवातून पुढे येत आहे.

दूरध्वनी क्रमांक ०२५८३–२२४३२५ सतत खंडित अवस्थेत असल्याने नागरिकांना मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रवासात प्रचंड गैरसोय होत आहे. प्रवाशांना बसची वेळ, गाड्यांची उपलब्धता वा इतर आवश्यक माहिती तातडीने हवी असताना चौकशी कक्षाशी संपर्क साधणे अशक्य ठरते.
याबाबत स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नुकत्याच झालेल्या निवेदनाद्वारे त्यांनी आगार व्यवस्थापक यांचे लक्ष वेधले. दूरध्वनी क्रमांक नियमित सुरू करून चौकशी विभाग कार्यान्वित करण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या नियमांनुसार चौकशी कक्ष व दूरध्वनी क्रमांक कार्यरत ठेवणे हे संबंधित आगार प्रशासनाचे बंधनकारक कर्तव्य आहे. प्रवाशांची दिशाभूल, माहितीचा अभाव किंवा दुर्लक्ष झाल्यास प्रशासनाविरोधात जबाबदारी निश्चित केली जाते. त्यामुळे मुक्ताईनगर आगाराने तातडीने चौकशी सेवा कार्यान्वित करून नागरिकांच्या अडचणी दूर करणे हीच काळाची गरज आहे.
प्रवासी हा एसटीचा आत्मा आहे, आणि प्रवाशाला सेवा व विश्वास देणे हेच परिवहन महामंडळाचे प्रमुख ध्येय असले पाहिजे.मुक्ताईनगर │

प्रवासी हा एसटीचा आत्मा आहे, आणि प्रवाशाला सेवा व विश्वास देणे हेच परिवहन महामंडळाचे प्रमुख ध्येय असले पाहिजे.