मुक्ताईनगरमध्ये चोरीचे सत्र सुरूच – नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मुक्ताईनगर :
शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटना सतत घडत असून पोलीस प्रशासनाचे चक्क दुर्लक्ष होत असल्याची नाराजी नागरिकांमध्ये वाढत चालली आहे.
काल (शुक्रवार) संध्याकाळी साडेपाच वाजता भर चौकातील श्रीकृष्ण डेअरीसमोरून पुन्हा एकदा दुचाकी चोरीची घटना घडली. दिनकर मधुकर निकम (रा. मुक्ताईनगर) यांच्या मालकीची हिरो स्प्लेंडर प्लस (क्र. MH.19.AJ.6076) ही गाडी एका चोरट्याने पळवली.
घटनेच्या वेळी निकम यांचा मुलगा सोनू दिनकर निकम हा डेअरीवर दूध व पेढे खरेदी करण्यासाठी गेला असता, त्याच क्षणी एका चोरट्याने लक्ष विचलित करून गाडी पळवण्यात यश मिळवले. परिसरातील दुकानांमधील सीसीटीव्ही तपासल्यानंतर आरोपी बोदवड रोडच्या मार्गाने जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या वाढत्या चोरीच्या घटनांमुळे शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
“चोरांना त्वरित जेरबंद करून योग्य ती कारवाई करावी, अन्यथा नागरिकांचा संयम सुटेल,” अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.
नागरिकांना आवाहन :
दुचाकी व वाहने सुरक्षित ठिकाणी लावावीत.
वाहन लॉक, सीसीटीव्ही यांचा वापर करावा.
संशयित हालचाली त्वरित पोलिसांना कळवाव्यात.



