वीज वितरण कंपनीच्या दिव्याखाली अंधार उष्णतेच्या लाटेत तासनतास वीजपुरवठा खंडित नागरिक त्रस्त

वीज वितरण कंपनीच्या दिव्याखाली अंधार उष्णतेच्या लाटेत तासनतास वीजपुरवठा खंडित नागरिक त्रस्त
( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी निलेश मेहेंगे )
वडगाव वान वीज वितरण कंपनीने संग्रामपूर तालुक्यातील वडगाव वान गावासह परिसरातील गावामध्ये वीज पुरवठ्याचा खेळखंडोबा केला आहे कंपनीच्या दिव्याखाली अंधाराचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे वीजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त असून त्याना उष्णतेच्या लाटेमुळे घरात असलेल्या नागरिकांना दुहेरी त्रासाचा सामना करावा लागत आहे एकीकडे तांत्रिक बिघाड तर दुसरीकडे विजेच्या लपंडावासह डासाच्या उच्छादाने नागरिक हैराण झाले आहेत तापमानाचा पारा ४2 ते ४४ अंशांवर गेला आहे त्यातच वेळोवेळी विजेचा लपंडाव तसेच तांत्रिक बिघाडाच्या नावाखाली तासन्तास वीजपुरवठा खंडित केला जात आहे डासांची मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने वयोवृध्द लहान मुलांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले वडगाव वान व परिसरातील गावांना वरवट बकाल केंद्रातून पुरवठा करण्यात येतो आधीच उन्हाचा कडाका तीव्र असतानाच वीज वितरणने विजेच्या लपंडावाचा तडका दिला आहे ४ एप्रिल रोजी उत्तररात्री दोन वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी १० वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित करण्यात आला यामुळे पाणीपुरवठा पिठाच्या गिरण्या प्रभावित झाल्या तर रात्रीच ऐन झोपेत बत्ती गुल झाल्याने पंखे कुलर बंद पडले विज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना उकाड्यासह डासांचा सामना करावा लागला या संदर्भात सोनाळा कार्यालयातील सहायक अभियंता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध झाले नाहीत गत दोन दिवसापासून वडगाव वान व परिसरातील गावांमध्ये वेळोवेळी वीजपुरवठा खंडित केला जात आहे त्यामुळे महावितरण विरोधात नागरिक संताप व्यक्त करीत आहेत ग्रामीण भागात रात्री बेरात्री तसेच दिवसा केव्हाही कुठलीही पूर्वसूचना न देता महावितरण कंपनीकडून अवेळी वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे फळपिकांसह इतर उन्हाळी रब्बी पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारापुढे नागरिक हतबल झाले आहेत



