Uncategorized

मुंदडा विद्यालयात शिक्षक दिन निमित्त विद्यार्थ्यांचे स्वयंशासन

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव :- ता:- ५  ना. ना. मुंदडा विद्यालयामध्ये शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी 'स्वयंशासन' करून दिन उत्साहात साजरा केला.सर्वप्रथम डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर   १४० विद्यार्थ्यांनी स्वयंशासन कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता.                            
  विद्यार्थ्यांनी शाळेत शिकविण्यात येत असलेल्या विषयाचे अध्यापन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून कु. धरती गोरे व उप मुख्याध्यापिका श्रद्धा पळसकर व पर्यवेक्षिका म्हणून कु. ज्ञानेश्वरी देशमुख व साक्षी सरोदे यांनी काम पाहिले. शारीरिक शिक्षक म्हणून कृष्णा मुठाळ तर शिपाई म्हणून राजरत्न गायकवाड, स्वप्निल तायडे, शिवम नवले, रुद्रेश कागणे यांनी उत्कृष्ट काम केले.                

यावेळी आयोजित कार्यक्रमाचे संचालन ज्ञानेश्वरी देवळे व समृद्धी गिरे यांनी प्रास्ताविक पूजा कढणे हीने .सरस्वती स्तवन सानिका कटारे तर आभार प्रदर्शन श्रावणी पाठक हीने केले.
यावेळी मुख्याध्यापक दिनेश उंटवाल, जेष्ठ शिक्षक श्रीराम रोडे,सुरेश मुंदडा, सौ अर्चना राजपूत गजानन कुबडे, अमोल कल्याणकर,संजीव भोंडणे, रमाकांत घुगे, हर्षवर्धन अडागळे व शाळेतील सर्व शिक्षका उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button