मीना मंच अंतर्गत शाळेत पत्रावळी व द्रोण करणे स्पर्धा .

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव -: येथील बालविकास मंदिर प्राथमिक शाळा येथे गणेशोत्सवानिमित्त मीना मंच अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्याचा विकास व्हावा याकरिता पत्रावळी व द्रोण तयार करण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
यानिमित्ताने शाळेतील वर्ग एक ते सातच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला विद्यार्थ्यांनी स्वतः पळसाचे पाने घेऊन त्यापासून पारंपरिक पद्धतीने पत्रावळी व द्रोण या ठिकाणी तयार केल्यात.
आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना पत्रावळी व द्रोण याबद्दल माहिती व्हावी व विद्यार्थ्यांना निसर्गातील या अनमोल ठेवीची माहिती व्हावी व प्रदूषण वाचवण्यास आपलां हातभार लागावा या उद्देशाने पारंपरिक पद्धतीने ही पत्रावळी तयार करण्याची स्पर्धा शाळेत आयोजित करण्यात आली. सदर स्पर्धेला प्रमुख उपस्थितीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल भिसडे व प्रमुख पाहुणे पालक प्रतिनिधी नेहा गायकवाड, सुषमा शिंदे यांनी उपस्थित राहून या स्पर्धेचे परीक्षण केले. सदर स्पर्धेत पुढील प्रमाणे विद्यार्थी क्रमांक काढण्यात आले. आर्यन वाठोरे- प्रथम क्रमांक,
नंदिनी ढवळे- द्वितीय क्रमांक,
धनश्री कंकाळ- तृतीय क्रमांक,
शेख कबीर- प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले. सदर स्पर्धेचे आयोजन सुषमा इंगळे यांनी केले तर शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कार्यक्रम पार पाडला.







