अनधिकृतपणे प्रचार.. रिक्षा चालकाविरुध्द गुन्हा दाखल

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
भडगाव प्रतिनिधी
आदर्श निवडणुक आचारसंहीताचे निवडणुक आयोगाने पारित केलेल्या आदेशाचे उलंघन करुन त्याच्या ताब्यातील वाहनावर विनापरवाना निवडणुकीतील उमेदवाराचे निवडणुक आयोगाने नेमुन दिलेले चिन्ह, बॅनर, झेंडे फिरवताना आढळल्याने भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जगदीश श्रावण भदाणे (वय 34 , रा. 296 रामपेठ भोईटे गढी जळगाव) यांच्या फिर्यादी वरून आरोपी सुभाष भिमराव कोळी (वय 51, रा. गिरड ता. भडगांव) हे दि.13 नोव्हेंबर रोजी ११ वाजेच्या सुमारास पिंपरखेड गावी बस स्टॅण्ड भागात सार्व जागी त्याचे ताब्यातील तीन चाकी अँपे रिक्षा क्र. MH-19-AX-1573 ह्या वाहनावर आदर्श निवडणुक आचार संहीता 2024 चे निवडणुक आयोगाने पारित केलेले आदेशाचे उल्लंघन केले.
त्याचे ताब्यातील वाहनावर विनापरवाना निवडणुकीतील उमेदवाराचे निवडणुक आयोगाने नेमुन दिलेले चिन्ह, बॅनर, झेंडे लावुन फिरताना मिळुन आला. याप्रकरणी भडगांव पोलीस स्टेशन गु.र. नं. 418/24 भारतीय न्याय संहीता कलम 223 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भडगाव पोलिस करीत आहे.



