शेतीसामाजिक

मालेगाव नगर पंचायत यांना दिले निवेदन

कोंडवाड्या अभावी जनावरे
शेतात

मोकाट गुरांचा ठिय्या प्रशासनाचे दुर्लक्ष :

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव कास्तकार यांनी मुख्याधिकारी यांना दिले निवेदन अंदाजे जनावरे ४० मोकाट गुरांच्या शेतात जाण्याने शेतातील उभे पीक जनावरं खातात व तसेच तुडवून टाकतात अतोनात नुकसान करतात या गुरांचा त्रास रात्रीच्या वेळी होतो कारण त्यावेळेस शेतात कोणीही माणूस नसतो.
मात्र नगरपंचायतकडे या मोकाट जनावरांना कोंडून ठेवण्याकरिता कोंडवाडा असून सुद्धा जनावरे शेतात आणि रस्त्यावर मोकाट फिरत असतात जनावरे रस्त्यावरच ठाण मांडत असल्यामुळे वाहतूकीला त्रास होत असून त्यातूनच अपघातही होत असतात शहरातील वाढती लोकसंख्या व त्याप्रमाणात वाहनांची संख्या वाढतच आहे हे होत असतांना रस्ते मात्रतसेच मोकाट गुरांचा ढोरांचा बंदोबस्त करावा. अन्यथा होणाऱ्या नुकसानीस मुख्याधिकारी जबाबदार राहनार असे निवेदन कर्ते कास्तकार मदन बळी, विजय बळी,राजेश बळी, विजय बळी, ज्ञानबा जाधव, विनोद बळी, रमेश बळी,उमेश बळी, रमेश मानधने,किसन बळी, संतोष बळी, भास्कर चोपडे,ऋषिकेश राऊत,मारुती बळी, मदन बळी, विजय बळी आदिच्या सह्या आहेत.

बॉक्स
वाहतूक प्रभावित गुरांचे मालकही बेजबाबदार शहरात मोकाटपणे फिरणाऱ्या गुरांचे मालकही या प्रकारास जबाबदार आहेत प्रशासनाने संबंधितांचा शोध घेऊन रस्त्यांवरील मोकाट गुरे त्यांच्या स्वाधिन करावी किंवा गुरांना किमान कोंडवाड्यात कोंडून रस्ते मोकळे करावे अशी मागणी सर्वच स्तरांतून होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button