बुलढाणामहाराष्ट्रराजकीयविदर्भशेती

बळीराजाचे अश्रू पुसण्यासाठी श्वेता महाले पालकमंत्र्यांसोबत बांधावर…

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस आवाज न्यायाचा चिखली प्रतिनिधी
अरुणा दतात्रय खंडागळे

एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी पालकमंत्र्यांना केली विनंती..

पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप पिकांची अवस्था गंभीर झाली असून चिखली विधानसभा मतदारसंघातील शेतकरी मोठ्या संकटाला सामोरे जात आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची व्यथा केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्ष शासनापर्यंत पोहोचावी, यासाठी आमदार श्वेता महाले पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद जाधव पाटील यांच्या समवेत दुष्काळग्रस्त भागातील शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांची व्यथा जाणून घेतली आणि शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास दिला. त्याच पार्श्वभूमीवर चिखली मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या अडचणी शासनाच्या सर्वोच्च स्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी आमदार श्वेता महाले पाटील यांनी सातत्याने पालकमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांच्या नुकसानीचा मुद्दा ठामपणे मांडला. मुख्यमंत्री दौऱ्यानंतर राज्य शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीबाबत निर्णयाची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

मौजे केळवद,सातगाव भुसारी, तसेच मालगणी,बेराळा, वसंतनगर येथील शेताची पाहणी यावेळी करण्यात आली.
पाहणीदरम्यान शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत पिकांची सद्यस्थिती, पावसाच्या खंडामुळे झालेली हानी, उत्पादनातील संभाव्य घट आणि त्यांच्या अडचणी आमदार श्वेता महाले पाटील यांनी जाणून घेतल्या. या भावनेतून त्यांनी पालकमंत्र्यांकडे बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्याची मागणी केली.

चिखली मतदारसंघातील एकही बाधित शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहू नये. पंचनामे आणि नुकसानभरपाईची प्रक्रिया प्रत्यक्ष शेतातील परिस्थिती लक्षात घेऊन झाली पाहिजे. बळीराजाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने संवेदनशीलतेने आणि तत्परतेने निर्णय घ्यावा,” अशी आग्रही भूमिका आमदार श्वेता महाले पाटील यांनी पालकमंत्र्यांसमोर मांडली.

यावेळी आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, जिल्हा कृषी अधिकारी संतोष डाबरे, तहसीलदार विजय सवडे, गटविकास अधिकारी समाधान वाघ, तालुका कृषी अधिकारी अशोक सुरडकर यांच्यासह विविध पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button