डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला कर्मयोगी स्व. तात्यासाहेब बोंद्रे च्या प्रेरणा स्थळाचा भूमिपूजन सोहळा! खा. मुकुल वासनिकांच्या हस्ते झाले भूमिपूजन! खा . वासनिकांनी दिल्या जुन्या आठवणींना उजाळा;

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा
स्वत. तात्यासाहेब तपस्वी होते… विचारांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. चिखली सारख्या ग्रामीण भागात तांत्रिक शिक्षणाची गंगा आणली ..एवढं मोठ विश्व उभारल्यानंतर सुद्धा त्यांचा त्यांना मोह नव्हता, त्यांनी वान प्रस्थाना श्रम स्वीकारला.. अनुराधा परिवारात उभारत असलेले त्यांचे प्रेरणास्थळ इथे येणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणा देणारे, ऊर्जा देणारे ठरेल असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सर चिटणीस खा. मुकुल वासनिक यांनी केले. चिखली येथील अनुराधा नगरात तपोभूमी परिसरात कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांच्या प्रेरणास्थळाचा भूमिपूजन सोहळा खा. यांच्या हस्ते आज, १२ सप्टेंबर रोजी संपन्न झाला यावेळी आयोजित सभेत खा. बोलत होते. यावेळी मंचावर पद्य श्री तात्याराव लहाने, अनुराधा परिवाराचे सर्वेसर्वा माजी आमदार राहुल बोंद्रे, आ. धीरज लिंगाडे, आ. किरण सरनाईक, माजी आ. रेखाताई खेडेकर, माजी आ. हर्षवर्धन सपकाळ, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, श्याम उमाळकर, गणेश पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना खा. वासनिक यांनी कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला. स्व. बाळकृष्ण वासनिक यांना १९७९
ला बुलढाणा लोकसभेचे तिकीट जाहीर झाल्यानंतर आम्ही संपूर्ण कुटुंब चिखलीत तात्या साहेबांकडे आलो, त्यावेळी मी कॉलेजला शिकत होतो. विद्यापीठाच्या क्रिकेट संघात प्रवेश होण्यासाठी त्यावेळी मी प्रयत्न करीत होतो, मात्र बुलढाण्याचे तिकीट जाहीर झाल्यावर ते हुकले.१७७९ ला. तात्या साहेबांची झालेली ती पहिली भेट होती. पहिल्याच भेटीत त्यांनी आम्हाला आपलंसं केलं असे खा. मुकुल वासनिक म्हणाले.
राहुल बोंद्रे यांनी आई-वडिलांची खूप सेवा केली. आई वडिलांला शब्द खाली न पडू देणे ही आपली संस्कृती, ती राहुल बोंद्रे यांनी जोपासली. आई वडिलांची सेवा करणारे माणसं आयुष्यात यशस्वी होतात असे प्रतिपादन
पद्य श्री डॉ. तात्याराव लहाने यावेळी म्हणाले. स्व. तात्या साहेबांनी रुग्णसेवा केली. तीच परंपरा महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून राहुल बोंद्रे पुढे नेत आहेत असेही ते म्हणाले. यावेळी उपस्थितांना आपल्या भाषणातून त्यांनी आरोग्य विषयक सल्ला ही दिला. मोबाईलचा वापर कमी करावा, स्किन टाईम जेवढा जास्त तेवढे आयुष्य कमी म्हणून २ तास आधी मोबाईल बंद करावा असेही डॉ. तात्याराव लहाने म्हणाले. तात्या साहेबांनी माळरानावर नंदनवन फुलवाला असे म्हणत.



