खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्र

माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात साजरा कुऱ्हा

सोहळा मैत्रीचा — उजाळा आठवणींच कुऱ्हा येथे २००४-०५ च्या बॅचचा माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात साजराकुऱ्हा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

अर्जुन गोरले

(ता. मुक्ताईनगर) —शैक्षणिक

आणि सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शिवाजी हायस्कूल कुऱ्हा व स्व. अशोक फडके माध्यमिक विद्यालय कुऱ्हा या दोन शाळांमधील सन २००४-०५ च्या बॅचमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा “सोहळा मैत्रीचा — उजाळा आठवणींचा” हा माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.हा मेळावा शिवाजी हायस्कूल कुऱ्हा येथे पार पडला. सुमारे तीस माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी विशेष या प्रसंगी विविध ठिकाणांहून एकत्र जमले. जुन्या सहकाऱ्यांच्या भेटीतून शालेय आठवणींना उजाळा देत आपुलकीचे क्षण सगळ्यांनी अनुभवले.माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी त्यांच्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. शालेय जीवनात शिक्षकांनी दिलेल्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कार आणि प्रोत्साहनामुळे आज या बॅचमधील अनेक जण शासकीय, खाजगी आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय पदांवर कार्यरत आहेत. काही विद्यार्थ्यांनी स्वतःच्या प्रयत्नांवर उद्योग आणि व्यापार क्षेत्रात यश संपादन केले आहे.कार्यक्रमाला सैयद खुदबुद्दीन, विशाल खोडके, महादेव पाटील, अलीम खान, अमित निबाळकर, अमित गव्हाळे, निलेश बनकर, किशोर झाल्टे, जया भोईटे, वर्षा केणे, संध्या जाधव, योगिता कपले, रुपाली सुस्ते, सीमा पवार, ज्योती ढोले, अर्चना धाडे, उषा जावरे, वैशाली चोपडे तसेच अन्य माजी विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. स्थानिक माजी विद्यार्थ्यांनी या आयोजनात विशेष सहकार्य केले.या स्नेहमेळाव्यास अनिल गवई व रुपेश धाडे यांनीही भेट देत उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात आठवणींना उजाळा देत भावनिक वातावरण निर्माण झाले. शेवटी सर्व माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्धार व्यक्त करत स्नेहमेळाव्याचा आनंदी वातावरणात समारोप झाला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button