स्मशान भूमीतील स्मशान जोगी कुटुंबीयांना दिवाळी फराळ वाटप. जीवनसाथी फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी. प्र. ता. गजानन खिल्लारे.जीवनसाथीफाउंडेशनच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व जपत देऊळगाव मही येथील स्मशानभूमीत वास्तव्यास असलेल्या स्मशान जोगी समाजातील कुटुंबांना दिवाळीच्या निमित्ताने फराळ आणि मिठाईवाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे समाजाच्या दुर्लक्षित घटकापर्यंत दिवाळीचा खरा आनंद पोचवण्यात यश आले आहे. स्मशान जोगी समाज अनेक वर्षापासून स्मशानभूमीत आपली वस्ती करून राहतो त्यांचे जीवन अत्यंत साधन साधन संपन्न ते पासून दूर असून, अनेकदा सण उत्सवाचा ही त्यांना लाभ मिळत नाही. याच पार्श्वभूमीवर जीवनसाथी फाउंडेशनने सामाजिक संवेदना जपत त्यांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन सन्मानाने दिवाळी फराळाचे वितरण केले. यामध्ये लाडू, चिवडा, करंजी, शंकरपाळे, यासारख्या पारंपारिक पदार्थाचा समावेश होता. हा उपक्रम केवळ मदतीपुरता मर्यादित न राहता त्यांच्या आयुष्यात दिवाळीचा खरा उजेड देणारा ठरला. जीवनसाथी फाउंडेशनचे पदाधिकारी, स्वयंसेवक आणि गावातील काही नागरिक या उपक्रमात सहभागी झाले होते लाभार्थी कुटुंबीयांनी फाउंडेशनचे आभार मानत आनंदाश्रुनी प्रतिक्रिया दिल्या दिवाळीत कोणी आमच्याकडे येत नाही पण या वर्षी आम्हाला वाटले की आपणही समाजाचा एक भाग आहोत, अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ महिलेने नम्रपणे व्यक्त केली. जीवनसाथी फाउंडेशन ने याआधीही विविध ठिकाणी समाज उपयोगी उपक्रम राबवत गरजू पर्यंत सेवा पोचली आहे. संस्थेच्या कार्यामुळे सामाजिक समतेचा संदेश सर्व दूर पोहोचतो आहे. यावेळी जीवनसाथी फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. महेश दंदाले, जनार्दन टेकाळे, सुनील मतकर, शिवाजी शिंगणे, अमोल बोबडे, संजय माऊली शिंगणे, रवींद्र कुलकर्णी उपस्थित होते.



