Uncategorized

आ. चैनसुख संचेती यांनी मतदार संघातील नागरिकांसाठी साकारला जनता दरबार

अनेक अधिकाऱ्यांची उपस्थिती मध्ये अनेक तक्रारी सह निवेदन

मलकापुर प्रतिनिधी (शेख निसार):- मलकापूर मतदारसंघातील नागरिकांच्या हिताच्या तक्रारी चा निपटारा करण्यासाठी ३० डिसेंबर२०२४ रोजी स्थानिक भ्रातृमंडळ येथे आ. चैनसुख संचेती यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार चे आयोजित करण्यात आले होते या जनता दरबार मध्ये तब्बल ४४९ तक्रारीसह निवेदने प्राप्त झालीत
यावेळी उपविभागीय अधिकारी
महसुल संतोष शिंदे, तहसीलदार राहुल तायडे, मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस पोलीस निरीक्षक गणेश गिरी, मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संदीप काळे व अमोल कोळी तरीच जिगाव प्रकल्प विभाग, आरोग्य विभाग, जलसंधारण विभाग, सार्वजानिक
बांधकाम विभाग, विज वितरण विभाग, नगर परिषद, कृषी विभाग, जिल्हा परिषद,पंचायत समिती, सह सर्वच शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी आणि पदाधिकारी सह कार्यकत्यांची प्रामुख्याने उपस्थिती

मलकापूर तालुक्यातील समस्या ऐकण्यासाठी व त्या सोडवण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आला आहे.
मलकापूर मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जनता दरबार साठी प्रभावी मार्ग असल्याचे प्रतिपादन केले, त्यानी शेतरस्त्यांचे उत्कृष्ट जाळे, शेतशिवाराचे समृद्धीकरण, प्रत्येक घरात विज, उतम आरोग्यसेवा, आणि अनेक सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या माणस त्यांनी यावेळी आपल्या मनोगतामध्ये सांगितले मलकापूर मतदारसंघातील विकास कामाच्या उद्दिष्टांवर भर देण्यात येईल असे आमदार चैनसुख संचेती यावेळी सांगितले व मतदार संघातील नागरिकांच्या समस्यांचे तत्काळ सोडविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button