महापुरुषांच्या पत्रकारितेचा युवा वर्गाने अंगीकार करावा — शरद बोदडे

मुक्ताईनगर–येथील श्रीमती जी. जी .खडसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी शिबिर दत्तकगाव घोडसगाव येथे दिनांक 25 डिसेंबर 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधी दरम्यान सुरू असून या शिबिरामध्ये दिनांक-26 डिसेंबर 2024 रोजी बौद्धिक सत्रात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना श्री. शरद बोदडे यांनी ‘महापुरुषांची पत्रकारिता’ या विषयावर मार्गदर्शन केले.
राजाराम मोहन राय, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळशास्त्री जांभेकर लोकमान्य टिळक अशा महापुरुषांच्या पत्रकारितेविषयी अनेक उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना महापुरुषांची थोर गाथा आपल्या व्याख्यानातून प्रस्तुत केली. महापुरुषांनी सदैव आपल्या लेखणीतून समाज हितच जोपासणे व सदैव समाजाच्या कल्याणासाठी संपूर्ण आयुष्य वेचले असे त्यांनी आवर्जून नमूद केले. तसेच दुसरे व्याख्याते श्री निलेश मेढे यांनी ‘पत्रकारिता काळाची गरज’ या विषयावर उदाहरणादाखल प्रकाश टाकला. तसेच आधुनिकतेच्या काळामध्ये प्रजातंत्राचा चौथा स्तंभ पत्रकारिता आज घडीला जिवंत ठेवण्यासाठी तरुणांनी पत्रकारीतेकडे वळावे असे आवाहन केले. त्यासाठी सर्वांनी लोकशाही वाचवण्यासाठी प्रयत्न करायला हवे. असे आवर्जून सांगितले. पत्रकारितेचा प्रारंभ ते आजपर्यंतची पत्रकारिता या विषयावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.तसेच दुसरे प्रमुख वक्ते
या व्याख्यानाचे सूत्रसंचालन डॉ. कृष्णा गायकवाड यांनी केले तर प्रास्ताविक डॉ.दीपक बावस्कर यांनी केले. तर सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. सी. व्ही. ठीगळे यांनी केले. या शिबिरासाठी 120 विद्यार्थी सहभागी आहेत.



