मुक्ताईनगर येथे महिला व अल्पवयीन मुलगा बेपत्ता; पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद. अवघ्या दहा तासात पोलिसांनी यशस्वी कामगिरी !


मुक्ताईनगर येथे महिला व अल्पवयीन मुलगा बेपत्ता; पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद
मुक्ताईनगर | प्रतिनिधी
मुक्ताईनगर शहर पोलीस ठाण्यात एका महिलेचा व तिच्या अल्पवयीन मुलाचा बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात मिसिंग रजिस्टर नंबर 09/2026 प्रमाणे दाखल करण्यात आली होती सदर मिसिंग मधील तक्रारदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहा उर्फ कोमल सोपान सुरळके (वय 32) व तिचा मुलगा संस्कार सोपान सुरळके (वय 8) हे दोघेही मेहून ता. मुक्ताईनगर येथून बेपत्ता झाले आहेत. सदर महिला ही मूळची रा. मेहून, ता. मुक्ताईनगर येथील रहिवासी असून ती आपल्या पतीसोबत संसार करत होती.तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता महिला तिचा मुलाला घेऊन ती विशाल तुळशीराम सोनवणे याच्यासोबत प्रेमसंबंधातून निघून गेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत संबंधित व्यक्तींना विचारणा करण्यात आली असता कोणतीही ठोस माहिती मिळू शकलेली नाही.सदर घटनेबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात इतर मिसिंग फाईल म्हणून नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक साहेब यांच्या आदेशाने पोलीस हवालदार संदीप शांताराम वानखेडे यांना देण्यात आला. पोलीस निरीक्षक श्री अडसूळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवलदार संदीप वानखडे व पोलीस कॉन्स्टेबल दीपक ठाकरे यांनी तपासाची चक्री फिरवली व अवघ्या दहा तासात मिसिंग महिला व तिच्या लहान मुलाला उज्जैन येथून आणण्यात आले. त्यानंतर बेपत्ता महिलेला तिच्या परिवारा समोर विचारपूस केली असता तिने तिच्या पतीसोबत जाण्यास नकार दिला. पोलिसांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला व तिला तिच्या पतीसोबत जाण्यास सांगितले असता परंतु सदर महिला ही पतीसोबत जाण्यास तयार झाली नाही. बेपत्ता महिला ही तिचा प्रियकर विशाल सोनवणे याच्यासोबत गेली.



