जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा ७ फेब्रुवारीला ; प्रवेश पत्र ऑनलाइन उपलब्ध .

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी : प्रशांत चव्हाण
बुलढाणा : जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता ९ वी आणि ११ वीच्या रिक्त जागासाठी निवड चाचणी परीक्षा शनिवार दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झाले असून विद्यार्थ्यांनी डाऊनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निवड चाचणी परीक्षा दि ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०:३० ते दुपारी १:३० या वेळेत दुपारी ९ वीसाठी जे व्ही मेहता हायस्कूल ता.खामगाव जि. बुलढाणा , नॅशनल हायस्कूल ता .खामगाव जिल्हा . बुलढाणा व अंजुमन हायस्कूल ता .खामगाव जि. बुलढाणा या तीन परीक्षा केंद्रावर तर ११ वी साठी पी .एम. श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय, ता. शेगाव जि. बुलढाणा व म. बी . बुरुंगले हायस्कूल ता. शेगाव जि. बुलढाणा या दोन परीक्षा केंद्रावर निवड चाचणी परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांनी सकाळी १० वाजता परीक्षा केंद्रावर हजर राहणे अनिवार्य आहे.
परीक्षेसाठी प्रवेशपत्र नवोदय विद्यालयाच्या .परीवरूर . सो. ळप या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, पालक व विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळावरून प्रवेश पत्र डाउनलोड करावे. व त्याची प्रिंट सोबत असणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेश पत्रावर नमूद केलेल्या केंद्राचे खात्री करून परीक्षेला येताना प्रवेश पत्रासोबत आवश्यक साहित्य घेऊन वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन पी .एम. श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य यांनी केले आहे.



