भाजप आणि शिंदे शिवसेना यामध्येच लढणार नगरपंचायतीची लढत
नगराध्यक्ष पदासाठी 13 तर नगरसेवक पदासाठी 126 अर्ज दाखल
मुक्ताईनगर । प्रतिनिधी ।
मुक्ताईनगर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकसाठी अर्ज दाखल करण्याचा १७ नोव्हेंबर हा शेवटचा दिवस अत्यंत गजबजलेला ठरला. दिवसभर उमेदवार, कार्यकर्ते आणि समर्थकांच्या गर्दीने नगरपंचायत कार्यालय परिसर गजबजून गेला. अंतिम दिवसाच्या अखेरीस नगराध्यक्ष पदासाठी 5 नवीन अर्ज, तर नगरसेवक पदासाठी तब्बल 66 अर्ज दाखल झाले.
आतापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी 11 व ऑफलाईन 2 असे एकूण 13 अर्ज आणि नगरसेवक पदासाठी तब्बल 126 अर्ज प्राप्त झाले आहेत. 18 नोव्हेंबर रोजी अर्जाची छाननी होणार आहे.
शेवटच्या दिवशी पक्षांची धावपळ-उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात
शेवटच्या क्षणी सर्वच पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केल्याने निवडणूक तापली. यंदा मुक्ताईनगरात कोणत्याही मोठ्या पक्षांमध्ये मोठी युती न झाल्याने त्रिकोणी व चौकोनी लढत होण्याची चिन्हे आहेत.
युतीची परिस्थिती
काँग्रेस-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युती-नगराध्यक्ष व ६ प्रभागांत उमेदवार, शिवसेना
शिदि गट-युती नाही, भाजप युती नाही, राष्ट्रवादी अजित पवार गट-स्वतंत्र लढत मुख्य लढत ही भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
पक्षनिहाय जाहीर उमेदवार
शिवसेना (र्शिद गट)- नगराध्यक्ष उमेदवारः संजना चंद्रकांत पाटील, भारती छोटू भोई. नगरसेवक-१७ पैकी १७ प्रभागात उमेदवार, भारतीय जनता पक्ष (भाजप)-नगराध्यक्ष उमेदवारः भावना ललित महाजन, नगरसेवक-१७ प्रभागात १७ उमेदवार. 3) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)-नगराध्यक्ष उमेदवारः फाहेमुनीसा यासीन खान, नगरसेवकः 6 प्रभागांत उमेदवार. 4) काँग्रेस-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
युती नगराध्यक्ष उमेदवारः भाग्यश्री अजय
जैन-नगरसेवकः 6 प्रभागांत संयुक्त उमेदवारी.
अर्जाची दिवसानुसार स्थिती (12 ते 17
नोव्हेंबर)-12 नोव्हेंबर : नगरसेवक-१ अर्ज, 13
नोव्हेंबर नगरसेवक 4 अर्ज, नगराध्यक्ष-1 अर्ज.
14 नोव्हेंबर: नगरसेवक 5 अर्ज. 15 नोव्हेंबर
नगरसेवक 18 अर्ज, नगराध्यक्ष 1 अर्ज. 16 नोव्हेंबर नगरसेवक-32 अर्ज, नगराध्यक्ष-4 अर्ज. 17 नोव्हेंबर नगरसेवक 66 अर्ज, नगराध्यक्ष-5 अर्ज. आज अखेर एकूण अर्ज : नगरसेवक पदासाठी 126 अर्ज. नगराध्यक्ष पदासाठी 13 अर्ज.
अंतिम दिवशी दाखल झालेल्या अर्जामुळे निवडणुकीची सरगर्मी पराकाष्ठेला पोहोचली आहे. जनसामान्यांमध्ये उमेदवारांविषयी उत्सुकता शिगेला 12 ते 16 नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल प्रक्रियेत संथ गती दिसत असली तरी शेवटच्या दिवशी पक्षांनी अधिकृत उमेदवार जाहीर केल्यानंतर शहरात राजकीय चर्चा, अटकळी आणि गणिते जोर धरू लागली.
मुख्य लढत कोणाची? मुस्लिम मतांचा कल कोणाकडे? महिला राखीव नगराध्यक्ष पदाचा फायदा कोणाला? यावर नागरिकांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. अर्ज छाननी 18 नोव्हेंबर रोजी होणार आहे. मुक्ताईनगरची ही निवडणूक, चौकोनी लढतीची शक्यता, मोठ्या प्रमाणावर दाखल झालेली अर्ज संख्या आणि पक्षांची कोंडी यामुळे
यंदाची निवडणूक विशेष रंजक ठरणार आहे.
जी भूमिका सुनेसाठी लोकसभेला व मुलीसाठी विधानसभेला आ. एकनाथ खडसे यांनी घेतली असली तरी आता तशीच भूमिका मुक्ताईनगर येथील नगरपंचायत निवडणुकीला घेतलेली आहे का, अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये रंगत आहे. आ. एकनाथ खडसे सोयीचे राजकारण करत आहे का, या बाबींकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आ. खडसे यांनी भाजपमधून शरद पवार राष्ट्रवादी गटामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या मुलीला मोठे पद दिले. त्यांना विधान परिषदेचे आमदारकी दिली परंतु ते स्वतः पक्ष वाढीसाठी काय करताय असे विरोधकांकडून बोलले जात आहे.
काँग्रेस-उबाठा-शिवसेना युती
काँग्रेसने सोडली उत्बाठा शिवसेना नगराध्यक्ष पदाची जागा भाग्यश्री अजय जैन उभाठा शिवसेना नगराध्यक्ष. चार काँग्रेसचे उमेदवार व दोन उबाठा (शिवसेना), उबाठा शिवसेना व काँग्रेस पुढील प्रभागात युती मध्ये लढणार. प्रभाग क्र.1, प्रभाग
क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 8, प्रभाग क्रमांक 9 व प्रभाग क्रमांक 16.
शरद पवार राष्ट्रवादी गट या पक्षाने मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणूक दरम्यान एन वेळेवर निवडणूक लढवण्यास नकार दिल्यामुळे उमेदवारांची झाली गोची त्यामुळे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना लागलीच निर्णय घेत भाजपा कडून तिकीट घ्यावे लागले त्यामध्ये चार राष्ट्रवादी उमेदवारांचा समावेश या चार उमेदवारांपैकी एका उमेदवाराने तर निवडणुकी आधीच मतदात्यावर पैसे खर्च करण्यास सुरुवात केली होती एन वेळेस भाजपमध्ये प्रवेश करावा लागला. +
भाजप पक्षाने मुक्ताईनगर नगरपंचायतीमध्ये युती न करता स्वबळावर लढवण्याची ताकद ठेवलेली आहे नगराध्यक्ष व आमचे सदस्य भरघोस मतांनी निवडून येणार अशी अपेक्षा व्यक्त केली आहे त्यामध्ये नगराध्यक्ष पदाचे तिकीट त्यांनी भावना ललित महाजन व माजी सरपंच व सुकृत नगरसेवक यांची पत्नी यांना दिलेले असून 17 प्रभागांमध्ये 17 उमेदवार त्यांनी उभे केलेले आहे.
शिवसेना शिंदे गट या पक्षाने देखील स्वबळावर लढण्याची भूमिका ठाम पणे ठेवत नगराध्यक्ष पदासाठी दोन उमेदवार पहिला उमेदवार त्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांची कन्या संजना चंद्रकांत पाटील यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केली असून व दुसरा उमेदवार भारती छोटू भोई यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे 17 प्रभागांमध्ये 17 उमेदवार लढवण्याची भूमिका ठामपणे मांडलेली आहे.



