Uncategorized

रिसोड विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी कडून प्रशांत गोळे उमेदवारी जाहीर.

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

   रिसोड - मालेगाव विधानसभा मतदारसंघातील यापूर्वी विदर्भातील अजित पवार गटाचे नेते आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पदावर असलेलं प्रशांत गोळे पाटील वंचित बहुजन आघाडी तर्फे उमेदवारी घोषित करण्यात आलीआहे.        
      रिसोड विधानसभा मतदारसंघात रिसोड व मालेगाव तालुक्याचा समावेश होतो. रिसोड तालुक्यातील केनवड येथील मुळ रहिवासी आणि अकोला येथील काही काळ खासगी कोचींग क्लास चालवून विद्यार्थी वर्गात लोकप्रिय झालेले प्रशांत गोळे पाटील सध्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यांनी आता बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहूजन आघाडी मध्ये प्रवेश घेतला आहे. त्यांचे वडील सुधीर गोळे हे वाशीम जिल्हा परिषदेचे सदस्य असून आमदार झनकांच्या जवळचे मानल्या जातात.
 वंचित कडून २१ ऑक्टोबरच्या सोळा उमेदवारांच्या यादीत ४ क्रमांकावर प्रशांत सुधीर गोळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यांनी मागील तीन महिन्यांपासून मतदारसंघांत आपल्या निवडणूक प्रचार सुरू केला आहे. त्यांच्या उमेदवारीचे पक्षात स्वागत करण्यात आले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button