## आ. सत्यजीत तांबे यांनी माध्य. बैठक जागेसंदर्भात बदल करावा##

श्री .एस.एस. अहिरे , (मुख्याध्यापक) नेहरू विद्या मंदिर तळवेल , ता. भूसावळ .
मा. सत्यजीत तांबे यांनी प्राथमिक/माध्यमिक शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षण विभागाच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात दि.12 जून 2023 रोजी खलील प्रमाणे बैठका आयोजित केल्या आहे.
1) मा. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, जळगाव व संघटना पदाधिकारी.
वेळ:दु.01.00वा
ठिकाण: माध्यमिक शिक्षक पतपेढी जळगाव.
2) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी(जि. प.जळगाव) व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व संघटना पदाधिकारी.
वेळ:दु.03.00वा.
ठिकाण: जिल्हा परिषद, जळगांव
असा नियोजीत कार्यक्रम बैठकी संदर्भात असला तरी माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पतपेढीतील भ्रष्ट्राचाराबाबत चौकशीचे आदेश विभागीय सहनिबंधक यांनी पत्र दिलेले आहे . त्यामूळे पतपेढीमध्ये बैठक घेतल्यास आपणांकडून अप्रत्यक्षरित्या हस्तक्षेप दाखविण्याचा प्रयत्न होऊ शकतो . तसेच सत्कार व आदारातीथ्य खर्च संचालक मंडळी अवाच्या सव्वा दाखवू शकतात आणी काही संचालक आपणाबरोबर फोटो काढून व्हाट्स अपद्वारे प्रसिद्धी मिळवित असतात तरी आपणांस नम्र विनंती की शक्य होईल त्यानुसार बैठक व्यवस्था बदलविण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती .



